BCCi Central Contract : श्रेयस, इशानसह 'या' 5 जणांची वार्षिक करारात सुट्टी; टीम इंडियाचा दरवाजा सुद्धा कायमचा बंद होणार?
केंद्रीय करारामध्ये किशन आणि अय्यरचा पत्ता कट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दोन खेळाडूंशिवाय आणखी 5 खेळाडू आहेत ज्यांना बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकले आहे.
BCCi Central Contract : स्टार खेळाडू इशान किशन आणि श्रेयस अय्यरवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत बीसीसीआयने जारी केलेल्या केंद्रीय करारामध्ये किशन आणि अय्यरचा पत्ता कट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दोन खेळाडूंशिवाय आणखी 5 खेळाडू आहेत ज्यांना बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकले आहे.
Additionally, athletes who meet the criteria of playing a minimum of 3 Tests or 8 ODIs or 10 T20Is within the specified period will automatically be included in Grade C on a pro-rata basis.
— BCCI (@BCCI) February 28, 2024
For more details, click the link below 👇👇https://t.co/IzRjzUUdel #TeamIndia
बीसीसीआयने 40 खेळाडूंची चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. सर्व खेळाडू A+, A, B आणि C श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. मात्र, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारात स्थान मिळालेले नाही. दोन्ही खेळाडू बराच वेळ बोर्डाच्या टार्गेटवर होते. मात्र, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत नाव कमावणारे युवा ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनाही केंद्रीय करारात स्थान मिळाले नाही.
चेतेश्वर पुजारा
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा बीसीसीआयच्या नव्या केंद्रीय करारापासून वंचित राहिला. यावेळी त्याचा कोणत्याही श्रेणीत समावेश नाही. पुजाराने भारतासाठी 103 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
दीपक हुडा
भारतासाठी 21 टी-२० सामने खेळलेला दीपक हुडा 2021 ते 2022 या काळात टीम इंडियामध्ये एक मोठे नाव होते. तो सतत भारतीय T20 संघाचा भाग होता. पण दीपकची खराब कामगिरी लक्षात घेऊन त्याला वगळण्यात आले. यावेळी तो केंद्रीय कराराचा भागही नाही.
शिखर धवन
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनलाही यावेळी बीसीसीआयच्या केंद्रीय करारात स्थान मिळाले नाही. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियापासून दूर आहे. त्याने भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत.
युजवेंद्र चहल
स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून काढून टाकण्यात आले आहे. 2023-24 च्या नवीन करारातही त्याला स्थान मिळाले नाही. चहलही बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे.
उमेश यादव
टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळलेला उमेश यादव देखील बीसीसीआयच्या नवीन केंद्रीय कराराचा भाग नाही. बराच काळ यादव भारताकडून फक्त कसोटी क्रिकेट खेळत होता. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी 57 कसोटी, 75 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या