एक्स्प्लोर
Advertisement
IPL 2018 : बॉल स्टम्पला लागूनही ड्वेन ब्राव्हो नॉट आऊट
ड्वेन ब्राव्होच्या तुफानी खेळीनं चेन्नईने या सामन्यात विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान आणखी एक घटना घडली. बुमराहच्या बॉलिंगवर बॉल स्टम्पला लागूनही ड्वेन ब्राव्हो नॉट आऊट राहिला.
मुंबई : 'चेन्नई सुपर किंग्स'ने 'मुंबई इंडियन्स'चा एका विकेटने सनसनाटी पराभव करुन आयपीएलच्या रणांगणात धडाकेबाज एन्ट्री केली. ड्वेन ब्राव्होच्या तुफानी खेळीनं चेन्नईने या सामन्यात विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान आणखी एक घटना घडली. बुमराहच्या बॉलिंगवर बॉल स्टम्पला लागूनही ड्वेन ब्राव्हो नॉट आऊट राहिला.
चेन्नईच्या डावातील 19 वं षटक सुरु होतं. हे षटक मुंबई इंडियन्सचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह टाकत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर ड्वेन ब्रावो फलंदाजी करत होता. बुमराहने हा चेंडू स्लो यॉरकर टाकला. पण हा चेंडू ब्राव्हेच्या बॅटला बॉल लागून स्टम्पलाही लागला. पण बेल्स खाली न पडल्याने, ब्रावोला जीवदान मिळालं.
विशेष म्हणजे, याच्या पुढच्याच बॉलवर ब्रावोने षटकार लगावत, चेन्नईचा विजयीपथावर नेऊन ठेवले. पण शेवटच्या बॉलवर तो आऊट झाला.
ब्राव्होने तीन चौकार आणि सात षटकार लगावत ही खेळी साकारली. ब्राव्हो बाद झाला, त्यावेळी चेन्नईला विजयासाठी सहा चेंडूंमध्ये सात धावांची आवश्यकता होती. केदार जाधवने एक चेंडू राखून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्याच्या आतषबाजीनं मुंबईला वीस षटकांत चार बाद 165 धावांची मजल मारुन दिली होती.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement