एक्स्प्लोर

Baba Indrajith Brave Innings : ओठांना टाके, तोंडाला बॅन्डेज लावून धडाकेबाज अर्धशतक! सेमीफायनलच्या महामुकाबल्यात अनिल कुंबळेची आठवण

Baba Indrajith : रुग्णालयातून परत येईपर्यंत तामिळनाडूचा डाव कोसळला होता. सलग पडणाऱ्या विकेट्समुळे इंद्रजितला लगेच बॅट घेऊन मैदानात यावे लागले. अर्ध्या तोंडाला बॅन्डेज लावून तो खेळपट्टीवर पोहोचला.

Baba Indrajith Brave Innings : विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2023) दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धाडसी खेळी पाहायला मिळाली. ही खेळी तामिळनाडूचा (Tamilnadu) फलंदाज बाबा इंद्रजितने (Baba Indrajith Brave Innings) केली. हरियाणाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात बाबा इंद्रजीत जखमी होऊन ओठांना टाके पडल्यानंतरही खेळपट्टीवर आला आणि अप्रतिम खेळी केली. तो आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मात्र, त्याच्या या साहसी खेळीनंतरही तामिळनाडू संघाला विजयाची नोंद करता आली नाही.

अर्ध्या तोंडाला बॅन्डेज लावून खेळपट्टीवर पोहोचला

विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2023) या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 293 धावा केल्या. डावाचा ब्रेक आला तेव्हा बाबा इंद्रजितच्या ओठांना दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात जावे लागले. त्याच्या वरच्या ओठांना टाके पडले. रुग्णालयातून परत येईपर्यंत तामिळनाडूचा डाव कोसळला होता. सलग पडणाऱ्या विकेट्समुळे इंद्रजितला लगेच बॅट घेऊन मैदानात यावे लागले. अर्ध्या तोंडाला बॅन्डेज लावून तो खेळपट्टीवर पोहोचला. हे दृश्य निश्चितच त्याची जिद्द दाखवणारे होते.

तामिळनाडूने हा सामना 63 धावांनी गमावला

इंद्रजित खेळपट्टीवर आला तोपर्यंत तामिळनाडू संघ 54 धावांत 3 गडी गमावून बसला होता. येथून इंद्रजीतने डावाची धुरा सांभाळली. त्याने 71 चेंडूत 64 धावांची वेगवान खेळी खेळली. जखमी अवस्थेतही त्याने एकूण 113 मिनिटे खेळपट्टीवर घालवली. तो 41व्या षटकात बाद झाला. दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्याने तामिळनाडूने हा सामना 63 धावांनी गमावला. तामिळनाडूचा संपूर्ण संघ 47.1 षटकात केवळ 230 धावांत गडगडला. हा सामना हरयाणा संघाने जिंकला, पण तामिळनाडूचा फलंदाज बाबा इंद्रजीतने मने जिंकली. 

बाबाच्या खेळीने झाली कुंबळेची आठवण 

दुसरीकडे, भारत आणि वेस्ट इंडीज यांनी संपूर्ण इतिहासात अनेक अविस्मरणीय लढती खेळल्या आहेत. खेळाडूंनी विलक्षण समर्पण दाखवून देशासाठी शरीर झोकून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. उत्कृष्ट क्रीडापटूचे असेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे. ज्यांनी अपार वेदना सहन करून संघाला विजय मिळवून दिला होता. 2002 मध्ये अँटिग्वा येथे झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान कुंबळे 7व्या क्रमांकावर फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज मर्विन डिलनच्या जोरदार बाऊन्सरचा सामना केला, परिणामी त्यांच्या चेहऱ्यावर आदळल्याने रक्त वाहू लागले आणि वेदना होत होत्या. मात्र, भारतीय क्रिकेट संघाप्रती कुंबळे यांनी बांधिलकी दाखवून दिली होती. ड्रेसिंग रूममध्ये माघार घेण्याऐवजी कुंबळेने मैदानावरच थांबण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी सुरूच ठेवली. चेहऱ्यावर बॅन्डेज आणि जबडा तुटलेला असतानाही खऱ्या चॅम्पियनची लवचिकता आणि दृढनिश्चय दर्शविला. हे अतूट समर्पण क्रिकेटच्या इतिहासातील संस्मरणीय आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणाVidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाजVijay Shivtare on Cabinet Expansion : अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही - विजय शिवतारेSudhir Mungantiwar : मंत्रिपद नाही, प्रत्येक वाक्यात वेदना, हळहळून सुधीरभाऊ काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
Embed widget