(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rinku Singh ICC T20I Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक अन् रिंकू सिंहची टी-20 रँकिंगमध्ये थेट हनुमान उडी!
Rinku Singh ICC T20I Ranking : रिंकूने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. T20 रँकिंगमध्ये रिंकूने 59व्या स्थानावर झेप घेतली आहे.
Rinku Singh ICC T-20 Ranking : टीम इंडियाचा उदयोन्मुख 'फिनिशर' रिंकू सिंहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये शानदार अर्धशतक झळकावले. रिंकूचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले. त्यानंतर त्याला आयसीसी क्रमवारीत (Rinku Singh ICC T-20 Ranking) मोठा फायदा झाला आहे. सेंट जॉर्ज पार्कवर आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात रिंकूने 39 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रिंकूचा स्ट्राईक रेट 174.36 होता.
Rinku Singh apologising for breaking the media box glass. 😂pic.twitter.com/Q8nK6Y9g99
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 13, 2023
रिंकूने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. T20 रँकिंगमध्ये रिंकूने 59व्या स्थानावर झेप घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत रिंकूचे 464 गुण झाले आहेत. रिंकू सिंहने पर्दापणात आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्याच T20 सामन्यात 38 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर पुढील सामन्यात त्याने नाबाद 37 धावा केल्या होत्या.
Rinku Singh has broken the glass of media box with a six. 🔥
— Johns. (@CricCrazyJohns) December 12, 2023
- The future is here. pic.twitter.com/4hKhhfjnOr
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून टीम इंडियात स्थान
रिंकू सिंहने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. गेल्यावर्षी म्हणजे आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करून त्याने निवडकर्त्यांचे आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले. 2023 च्या आयपीएलमध्ये, रिंकूने 14 सामन्यांच्या 14 डावांमध्ये फलंदाजी केली आणि 59.25 च्या सरासरीने आणि 149.53 च्या स्ट्राइक रेटने 474 धावा केल्या, ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता.
The Rinku Singh show. 💪
— Johns. (@CricCrazyJohns) December 13, 2023
- Highlights of his maiden fifty in International cricket, India has got a diamond in middle order.pic.twitter.com/XpH8fjQfGB
आत्तापर्यंत रिंकूने टीम इंडियासाठी फक्त टी-20 फॉरमॅट खेळला आहे. पण तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताच्या एकदिवसीय संघाचाही एक भाग आहे. त्याच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळले आहेत, 7 डावात फलंदाजी करत 82.66 च्या सरासरीने आणि 183.70 च्या स्ट्राइक रेटने 248 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 68 झाली आहे.
The impact of Rinku Singh's six in the media box.pic.twitter.com/LGEC6YwzO7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 13, 2023
इतर महत्वाच्या बातम्या