एक्स्प्लोर

Australia vs Afghanistan: अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा दणका, महिला क्रिकेटवर बंदी आणाल तर...

Australia vs Afghanistan: तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर आता अफगानिस्तानच्या क्रिकेटवर संकट आलं आहे. ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या जाणारा कसोटी सामना रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.

Australia vs Afghanistan: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर आता अफगानिस्तानच्या क्रिकेटवर संकट आलं आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणारा एकमेव कसोटी सामना रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.  क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणणं आहे की, जर तालिबान अफगानिस्तान मधील महिला क्रिकेटवर बंदी आणणार असेल तर ते नोव्हेंबरमधील हा कसोटी सामना रद्द करतील. 

Taliban Government Update : अफगाणिस्तानचं नवं सरकार! मुल्ला हसन अखुंद नवे पंतप्रधान तर सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान महिला क्रिकेट टीमच्या भविष्या विषयी चिंता प्रकट केली आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आलं आहे की, जर तालिबान सरकारकडून महिलांना क्रिकेट खेळू दिलं जाणार नाही हे खरं असेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानमधील कसोटी सामना रद्द केला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं म्हटलं आहे की, ''महिलांच्या क्रिकेटला देखील ते पुरुषांच्या क्रिकेट इतकंच महत्व देतात. त्यामुळं जर अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट खेळणार नसतील तर अफगाणिस्तानच्या पुरुष संघालाही खेळू दिलं जाणार नाही''. 

'Taliban : अफगाणिस्तानमध्ये आता शरिया कायदा लागू होणार; तालिबान सरकारच्या सर्वोच्च नेत्याची घोषणा

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं म्हटलं आहे की, आम्ही  राशिद खान सारख्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळताना पाहू इच्छितो. मात्र हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा रोया समीम आणि त्यांची टीम देखील क्रिकेट खेळेल.  ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशननं देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.   अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यात एकमेव कसोटी सामन्याचं आयोजन 27 नोव्हेंबरपासून होबार्टमध्ये करण्यात आलं आहे.  

जर तालिबाननं अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला बॅन केलं तर अफगाणिस्तानला आयसीसीच्या नियमित सदस्यत्वाचा दर्जा देखील गमवावा लागेल. आयसीसी त्याच देशांना नियमित सदस्यत्व देतं ज्या देशाचे महिला क्रिकेट संघ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. 

तालिबाननं जाहीर केला अजेंडा, शरिया कायदा लागू करणार
नुकतंच तालिबानच्या सरकारने आपला अजेंडा जाहीर केला आहे. यापुढे अफगाणिस्तानमध्ये  शरिया कायदा (Sharia Law) लागू करणार असल्याची घोषणा तालिबानच्या नव्या सरकारने केली आहे. देशात इस्लामिक नियम आणि शरिया कायदा लागू करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातील असं तालिबानच्या नव्या सरकारचा प्रमुख मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याने स्पष्ट केलं आहे. आमच्या समाज वर्तुळात महिलांचा सक्रिय सहभाग आम्हाला हवा आहे. आमच्या चौकटीत राहून महिलांनी नोकरी किंवा शिक्षण घेतलं तर आमची मनाई नाही. अफगाणिस्तान इस्लाम धर्माच्या चौकटीत चालेल, असंही त्यांनी म्हटलंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
Embed widget