Taliban Government Update : अफगाणिस्तानचं नवं सरकार! मुल्ला हसन अखुंद नवे पंतप्रधान तर सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री
हक्कानी नेटवर्कचा सिराजुद्दीन हक्कानी हा गृहमंत्री तर तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा याकुब संरक्षण मंत्री झाला आहे

काबुल : अफगाणिस्तातील तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली आहे. मुल्ला हसन अखुंद हे अफगाणिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहे. तर सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री आणि मुल्ला अब्दुल गनी बरादर उपमुख्यमंत्री झाले आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब अफगाणिस्तानचा नवा संरक्षण मंत्री असणार आहे. तर अमीक मुत्तकी यांना परराष्ट्रमंत्री बनवले आहे.
कोण आहे मोहम्मद हसन अखुंद?
मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा गेल्या वीस वर्षांपासून तालिबानमध्ये महत्वाची भूमिका बजावतोय. तालिबानशी संबंधित महत्वाचे निर्णय घेणाऱ्या रहबारी शूराचे प्रमुख आहे. तसेच एका धार्मिक नेत्याच्या स्वरुपात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यामुळे तालिबान सरकारच्या प्रमुखपदी नाव सर्वात पुढं आलं.
काबुलच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हक्कानी नेटवर्कचा सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबान सरकारचा नवी गृहमंत्री असणार आहे तर तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा याकुब हा संरक्षण मंत्री असणार आहे. अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी आंतरराष्ट्र्चीय दहशतवाद्यांच्या यादीत आहे. अमेरिकेने हक्कानी विषयी माहिती देणाऱ्यास 50 लाख डॉलरचे बक्षीस देखील जाहीर केली आहे. अमेरिकेच्या एफबीआयच्या वेबसाईटनुसार 2008 साली अफगाण राष्ट्रपती हामिद करजईंच्या हत्येच्या कटात हक्कानी देखील सहभागी होता.
काश्मीर मुद्द्यावर तालिबानची भूमिका स्पष्ट
काहीच दिवसांपूर्वी आम्हाला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचं असल्याचं तालिबानने स्पष्ट केलं होतं. आता काश्मिरातील मुस्लिमांसाठी आपल्याला आवाज उठवण्याचा हक्क असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. त्यामुळे तालिबान्यांच्या आडाने पाकिस्तान काश्मिरातील फुटीरतावादी गटाला उसकवणार आणि भारतातील दहशतवादी कारवायांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने झुम कॉलच्या माध्यमातून बीबीसीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला की, भारतातील जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम असतील वा इतर देशांतील मुस्लिम असतील, धर्माच्या आधारे त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचा तालिबानला पूर्ण हक्क आहे. आम्ही काश्मिरातील मुस्लिमांच्या हक्कांसाठी आवाज उठवू आणि भारताला सांगू की मुस्लिम हे तुमचेच नागरिक आहेत, त्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
