(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive : शाहिद आफ्रिदीकडून हार्दिक पांड्याचं कौतुक, म्हणाला आमच्याकडे अशा अष्टपैलू खेळाडूची कमतरता
Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्याचं एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात बोलताना खास कौतुक केलं आहे.
IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हा सामना रविवारी रंगणार असून आशिया चषक स्पर्धेतील (Asia Cup 2022) सर्वात जास्त पाहिला जाणारा हा सामना असणार यात शंका नाही. याआधी ग्रुप स्टेजच्या सामन्यात दोघे आमने-सामने आले असतानाही एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. दरम्यान आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार असल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एबीपी न्यूजच्या स्पेशल शो बिगेस्ट मॅचमध्ये भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे. त्याने हार्दिकचे कौतुक करत आमच्याकडे हार्दिकसारखा अष्टपैलू नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
एबीपी न्यूजचा स्पेशल शो बिगेस्ट मॅचमध्ये कपिल देव, शाहीद आफ्रिदी असे दिग्गज सामिल झाले होते. यावेळी शाहिद आफ्रिदीने हार्दिक पांड्याचे कौतुक करताना सांगितले की, भारतीय संघाला हार्दिकमुळे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी खेळतो तशी भूमिका पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्या खेळाडूची कमतरता आहे. तसंच आफ्रिदी म्हणाला की, भारतीय संघ मधल्या फळीत पाकिस्तानपेक्षा मजबूत आहे. आमचे मधल्या फळीतील खेळाडू सतत संघाच्या आत-बाहेर करत आहेत. म्हणूनच आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मधल्या फळीत आम्हाला पांड्यासारखा खेळ करणाऱ्या खेळाडूंची गरज आहे.
Watch | एशिया कप पर सबसे बड़ा शो, भारत Vs पाकिस्तान....सुपर-4 में घमासान @GSV1980 | @romanaisarkhan | @therealkapildev | @azharflicks | @SAfridiOfficial#AsiaCup2022 #INDvsPAK #IndiaVsPakistan pic.twitter.com/f33Tl5dDk5
— ABP News (@ABPNews) September 3, 2022
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत पुन्हा एकदा रंगणार आहे. याआधी 28 ऑगस्ट रोजी भारताने ग्रुप स्टेजच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली होती. यावेळी आधी फलंदाजी करत पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या. भारताने 19.4 षटकात 5 गडी गमावत 148 धावांचे लक्ष गाठले. यावेळी जाडेजा आणि पांड्या यांनी कमाल कामगिरी केली होती. ज्यानंतर आता सुपर 4 च्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
हे देखील वाचा-