![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND Vs PAK Playing 11: दिनेश कार्तिक, आवेश खानला संधी, ऋषभ पंतला विश्रांती; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
IND Vs PAK Playing 11: भारत आणि पाकिस्तान यांच्यात (India vs Pakistan) आशिया चषकातील दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे.
![IND Vs PAK Playing 11: दिनेश कार्तिक, आवेश खानला संधी, ऋषभ पंतला विश्रांती; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन IND Vs PAK Asia Cup 2022 Team India Skipper Rohit Sharma Won Toss and Choose Field First Against Pakistan IND Vs PAK Playing 11: दिनेश कार्तिक, आवेश खानला संधी, ऋषभ पंतला विश्रांती; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/28/a9a7fe4ee6c1ab8fd6560597c970a9801661694058145344_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND Vs PAK Playing 11: भारत आणि पाकिस्तान यांच्यात (India vs Pakistan) आशिया चषकातील दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik), आवेश खानला (Avesh Khan) संधी देण्यात आलीय. तर, युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती देण्यात आलीय. आशिया चषकातील सर्वात मोठा सामना म्हणूनही या सामन्याकडं पाहिलं जातंय. भारत आणि पाकिस्तानचे संघ 10 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर आमने-सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान अखेरचा सामना गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकात खेळला गेला. मात्र, या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे.
कधी कुठं रंगणार सामना?
भारत आणि पाकिस्तानचा यांच्यात आज (28 ऑगस्ट) रोजी आशिया चषकातील दुसरा सामना खेळला जाणार आहे. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येईल.तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय, आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सामने खेळण्यात आले आहेत. यातील भारतानं 8 आणि पाकिस्तानने 5 सामन्यात विजय मिळवला आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. भारतानं सर्वाधिक 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. आकडेवारीनुसार, भारताचं पारडं जडं दिसत असलं तरी, पाकिस्तानचा संघ सध्या टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे.
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
पाकिस्तान
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)