IND vs PAK : पाकिस्तानला मोठा झटका, आफ्रिदीनंतर मोहम्मद वासिमही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर, पण हसन अलीची ENTRY
Asia Cup 2022 : पाकिस्तानला आशिया कपमधील पहिला सामना खेळण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना त्यांचा एक महत्त्वाचा खेळाडू मोहम्मद वासिम ज्युनियर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.
Mohammad Wasim Ruled Out Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतून पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद वसिम ज्युनियर (Mohammad Wasim JNR.) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. 27 ऑगस्टपासून स्पर्धा सुरु होत असून पाकिस्तान पहिलाच सामना भारताविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. त्यामुळे पहिला सामना खेळण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना त्यांचा एक महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेबाहेर गेल्याने संघाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. पण सुदैवाने त्याला रिप्लेसमेंट म्हणून अनुभवी हसन अली (Hasan Ali) संघात आला असून त्याचा भारताविरुद्धचा रेकॉर्डही दमदार आहे. ज्यामुळे तो अंतिम 11 मध्ये असल्यास पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. मोहम्मद स्पर्धेबाहेर गेल्याची माहिती आयसीसीने (ICC) ट्वीट करत दिली आहे.
🚨 Replacement named after injury rules Mohammad Wasim out of the 2022 Asia Cup!
— ICC (@ICC) August 26, 2022
Details 👇https://t.co/bg9XEjDSB2
मोहम्मद वसिम ज्युनियर सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला. सराव करताना त्याला पाठीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्याला त्वरीत एमआरआय करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. अजूनतरी त्याच्या प्रकृतीबद्दल कोणताही अपडेट समोर आला नसला तरी त्याची दुखापत संघाला अत्यंत महाग पडू शकते. वसिम याने आतापर्यंत केवळ 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असले तरी यामध्ये त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तानची गोलंदाजी
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजीचा विचार करता, शाहीन आफ्रिदीची अनुपस्थिती संघाची डोकेदुखी नक्कीच वाढवू शकते. पण संघ व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या संघानुसार शाहीनसाठी त्यांनी नसीम शाह या 19 वर्षीय गोलंदाजाचा विचार केला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध नसीमच्या वेगापासून भारतीय फलंदाजांना सावध राहावं लागणार आहे. याशिवाय मोहम्मद वसीम ज्युनियर, शाहनवाज दहनी या मीडियम फास्ट बोलर्सचीही ताकद पाकिस्तानकडे होती. पण आता मोहम्मद दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. पण सोबतच त्याची रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेला हसन अलीही पट्टीचा गोलंदाज असल्याने त्याचा फायदा नक्कीच पाकिस्तानला होणार आहे. तसंच शाहीनच्या जागी संधी देण्यात आलेला मोहम्मद हसनैन याच्याबद्दलही भारताला विचार करावा लागेल, कारण केवळ 19 वर्षीय मोहम्मदच्या गोलंदाजीत वेग आणि स्वींग दोन्ही असल्यानं त्याच्यापासून फलंदाजांना मोठा धोका आहे. याशिवाय फिरकी गोलंदाजीची जबाबदारी शादाब खान आणि उस्मान कादिर यांच्याकडे असेल.
हे देखील वाचा-