Asia Cup 2022 : विराट कोहलीचं शतक, भारताचा 212 धावांचा डोंगर, अफगाणिस्तान शेवट गोड करणार का?
IND vs AFG, 1 Innings Highlight : विराट कोहलीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारतानं निर्धारित 20 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभारला आहे.
IND vs AFG, 1 Innings Highlight : विराट कोहलीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारतानं निर्धारित 20 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभारला आहे. आशिया चषकाचा शेवट गोड करण्यासाठी अफगाणिस्तानसमोर 213 धावांचे आव्हान आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट कोहली आणि राहुल यांनी सलामीची जबाबदारी यशस्वी स्वीकारली. राहुल आणि विराट कोहली यांनी दमदार सलामी दिली. दोघांनीही आपापली अर्धशतकं पूर्ण केली. विराट कोहली आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागिदारी केली. राहुल 62 धावा काढून बाद झाला. राहुलनं 41 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यंदाच्या आशिया चषकातील राहुलचं हे पहिलं अर्धशतक होय. राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही लगेच बाद झाला. पण दुसऱ्या बाजूला विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये होता. विराट कोहलीनं अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विराट कोहलीनं त्यानंतर ऋषभ पंतच्या साथीनं डावाला आकार दिला. ऋषभ पंतनं 16 चेंडूत 20 धावांची खेळी केली. विराट कोहलीनं नाबाद122 धावांची खेळी केलीय. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं 12 चौकारांचा पाऊस पाडला. तसेच 6 खणखणीत षटकारही लगावले.
आशिया चषकातील अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाने नाणेफेक गमावली आहे. सुपर 4 च्या तिन्ही सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघाला सुपर 4 च्या आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघ शेवट गोड कऱण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
भारतीय संघानं कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल यांना आराम दिला आहे. केएल राहुलकडे संघाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. दीपक चाहर, अक्षर पटेल आणि दिनेश कार्तिक यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
भारताची प्लेईंग 11 -
लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ॠषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह
अफगाणिस्तानची प्लेईंग 11
हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबज, इब्राहिम झद्रान, करीम जनत, नजीबुल्लाह जद्रान, मोहम्मद नबी, रशीद खान, अझमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक
भारताची फलंदाजी -
Batting | R | B | 4s | 6s |
लोकेश राहुलझे नजीबुल्लाह जद्रान गो फरीद अहमद | 62 | 41 | 6 | 2 |
विराट कोहलीनाबाद | 122 | 61 | 12 | 6 |
सूर्यकुमार यादवत्रिफळाचीत फरीद अहमद | 6 | 2 | 0 | 1 |
ॠषभ पंतनाबाद | 20 | 16 | 3 | 0 |
दीपक हूडा | ||||
दिनेश कार्तिक | ||||
अक्षर पटेल | ||||
रविचंद्रन अश्विन | ||||
दीपक चाहर | ||||
भुवनेश्वर कुमार | ||||
अर्शदीप सिंह |
अफगाणिस्तानची गोलंदाजी
BOWLING | O | M | R | W |
फजल हक | 4 | 0 | 51 | 0 |
मुजीब उर रहमान | 4 | 0 | 29 | 0 |
फरीद अहमद | 4 | 0 | 57 | 2 |
रशीद खान | 4 | 0 | 33 | 0 |
मोहम्मद नबी | 3 | 0 | 34 | 0 |
अझमतुल्ला ओमरझाई | 1 | 0 | 8 | 0 |