एक्स्प्लोर

IND vs PAK: फलंदाज की गोलंदाज? पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचे खरे शिल्पकार कोण? सचिन तेंडुलकर म्हणतोय...

IND vs PAK: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर काल खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर (India vs Pakistan) पाच विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला.

Sachin Tendulkar On India vs Pakistan Match: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर काल खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर (India vs Pakistan) पाच विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. ज्यामुळं संपूर्ण देशभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.  दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) भारतीय खेळाडूंचं कौतुक केलंय. तसेच वेगवान गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळंच भारताला पाकिस्तानविरुद्ध यश मिळालंय, असं सचिन तेंडुलकरचं मत आहे.

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट्स घेतल्या आहेत. सचिन तेंडुलकर म्हणाला की, "पाकिस्तानविरुद्ध विजयाचं श्रेय वेगवान गोलंदाजांना जातंय. या सामन्यात आमचे वेगवान गोलंदाज दबाव निर्माण करण्यात यशस्वी झाले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली." याशिवाय सचिन तेंडुलकरनं हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फलंदाजीचंही कौतूक केलं. "हार्दिक पांड्याची खेळी खूप महत्त्वाची होती. तो शेवटपर्यंत राहिला आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच परतला. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची फलंदाजीही उत्कृष्ट होती. या विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन."

भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरला
पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. भुवनेश्वर कुमारनं बाबर आझमला 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. यानंतर पाकिस्तान संघाला सामन्यात पुनरागमन करता आलं नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं एकाकी झुंज दिली. या सामन्यात त्यानं पाकिस्तानकडून सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. 

भारताचा पुढील फेरीतील प्रवेश निश्चित
भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघाची दमछाक झाली. भारतानं 147 धावांवर पाकिस्तानला ऑलआऊट केलं.  मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. पण अखेरीस हार्दिक पांड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 19.4 षटकांत 5 विकेट गमावून 148 धावांचं लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह भारताचा पुढील फेरीत प्रवेश निश्चित आहे.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget