एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ind vs Pak: ऋषभ पंत बाहेर का? रोहित शर्माच्या निर्णयावर चाहते भडकले; गौतम गंभीरही हैराण

Ind vs Pak: आशिया चषक-2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आपला पहिला सामना खेळत आहेत. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.

Ind vs Pak, Asia Cup 2022: आशिया चषक-2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आपला पहिला सामना खेळत आहेत. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताचा रोहित शर्मानं सर्वांना चकीत करणारा निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात  युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला (Rishabh Pant) वगळून दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संघात संधी देण्यात आली. रोहित शर्माच्या या निर्णायावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. ऋषभ पंत गेल्या एक-दोन वर्षांपासून सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. मात्र, तरीही त्याला संघातून वगळण्यात आल्यानं चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही (Gautam Gambhir) याबाबत आपली प्रतिक्रिया दिलीय.

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात ऋषभ पंतला वगळण्यात आल्यानं चाहते सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकासाठी कशी तयारी करत आहे? ऋषभ पंतला प्लेईंग इलेव्हन वगळण्याचा कोणाचा निर्णय होता? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. तर काही चाहत्यांनी ऋषभ हा भारतीय संघाचे भविष्य असताना दिनेश कार्तिकला जास्त प्राधान्य का दिले जात आहे? असाही प्रश्न काही चाहत्यांनी विचारलाय.

ट्वीट-

ट्वीट-

ट्वीट- 

गौतम गंभीर काय म्हणाला?
नाणेफेकीनंतर गंभीर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला की, "ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संघात स्थान देणं मला काही समजलं नाही. माझ्या मते रवींद्र जाडेजा ऐवजी दीपक हुडाला संघात स्थान दिलं जाऊ शकत होतं." 

संघ-

भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह. 
पाकिस्तान 

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024Uddhav Thackeray Group : बैठकीत EVM गोंधळासह पराभुतांचा मविआत न लढण्याचा सूरEknath Shinde Banner Ayodhya : अयोध्यावासीयोंकी हैं पुकार, शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
Embed widget