(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashleigh Barty : टेनिस जगताला मोठा धक्का! जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू अॅश्ले बार्टी वयाच्या 25 व्या वर्षी निवृत्त
Ashleigh Barty : टेनिसपटू अॅश्ले बार्टीने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ती फक्त 25 वर्षांची आहे. सध्या जागतिक क्रमवारीतल पहिल्या क्रमांकावरील महिला टेनिसपटू आहे.
Ashleigh Barty Retirement : जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू अॅश्ले बार्टी (Ashleigh Barty) वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. टेनिससाठी ठेवलेले ध्येय पूर्ण करणे, परदेश दौऱ्यांचा थकवा दूर करणे आणि घर आणि कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देणे या उद्देशाने टेनिसला अलविदा केल्याचं तिने सांगितलं आहे. तिचा हा निर्णय संपूर्ण टेनिस जगताला धक्का देणारा आहे. अलीकडेच तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. ती सध्या टेनिसमधूल अव्वल खेळाडू आहे.
बार्टीने आपल्या टेनिस कारकिर्दीत एकूण 15 विजेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये तीन ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा समावेश आहे. तिने 2019 मध्ये फ्रेंच ओपन, 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. एकूण 121 आठवडे ती महिला टेनिस क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. बार्टीने बुधवारी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत टेनिसला अलविदा केला. व्हिडीओमध्ये तिने म्हटलं आहे की, 'अॅश्ले बार्टी ही अशी व्यक्ती आहे जिची अनेक स्वप्ने आहेत आणि या स्वप्नांमध्ये कुटुंब आणि घरापासून दूर राहून जगभर फिरण्याची गरज नाही. मला नेहमी माझ्या कुटुंबासोबत राहायचे आहे.'
View this post on Instagram
बार्टीने सांगितले की, 'टेनिसवरील माझे प्रेम कधीच संपणार नाही. 'टेनिस माझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा भाग आहे, पण आता मला वाटतं की मी माझ्या आयुष्याचा दुसरा भाग एक खेळाडू म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून एन्जॉय करायला हवा. बार्टीने यापूर्वीही टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने 2014 मध्ये केवळ 17 वर्षांची असताना प्रवासामुळे टेनिसला अलविदा केला होता.
त्यानंतर 2016 मध्ये अॅश्लेने पुनरागमन केले आणि हळूहळू ती टेनिस क्रमवारीत वर गेली. तिने पुढे सांगितले की, 'मला माहित आहे की मी हे यापूर्वी केले आहे, परंतु त्यावेळी इतर भावना होत्या. मी टेनिससाठी खूप कृतज्ञ आहे. यामुळे मला माझ्या स्वप्न पूर्ण करता आली. परंतु मला माहित आहे की माझी उर्वरित स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IPL 2022 : बादशाहच्या आवाजात लखनऊ सुपर जायंट्सचं थीम साँग, जर्सीही लाँच
- KKR Team Preview : कोलकाता नाईट रायडर्स करणार आयपीएलचा शुभारंभ, कशी असेल यंदाच्या हंगामासाठी रणनीती?
- IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha