(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत.
नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत, ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत.
भाजपला मुख्यमंत्री पद निश्चित झाल्याची जवळपास सूत्रांची माहिती दिल्लीतून निघाल्यानंतर, एकनाथ शिंदे नाराज झाले.
ही बातमी पण वाचा
Eknath Shinde: मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार? राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदेंचं ट्विट; म्हणाले, एकत्रित निवडणूक लढवली अन्...
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.