KKR Team Preview : कोलकाता नाईट रायडर्स करणार आयपीएलचा शुभारंभ, कशी असेल यंदाच्या हंगामासाठी रणनीती?
KKR in IPL 2022 : यंदाच्या आयपीएलचा पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्स खेळणार असून चेन्नई संघाविरुद्ध हा सामना असणार आहे.
KKR Team Preview : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रिमीयर लीगला शनिवार, 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या लीगचा पहिला सामना यंदाही चेन्नई सुपरकिंग्सचा असला तरी त्यांच्या विरोधात मुंबई इंडियन्स नसून कोलकाता नाईट रायडर्स हा संघ मैदानात उतरेल. दरम्यान केकेआरचा विचार करता यंदा त्यांना नवा कर्णधार श्रेयस अय्यर मिळाला असून महालिलावानंतर संघातही मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे आगामी हंगाम जिंकण्यासाठी संघाची रणनीती काय असू शकते, संघाची ताकद काय आणि कमजोरी काय? यावरही एक नजर फिरवूया..
केकेआरने यंदाच्या महालिलावापूर्वी आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नारायण या चौघांना रिटेन केलं होतं. त्यानंतर महालिलावात त्यांनी तब्बल 12.25 कोटी मोजत श्रेयस अय्यरला संघात सामिल केलं. याशिवाय पॅट कमिन्स, नितीश राणा, शिवम मावी यांच्यासाठीही मोठी रक्कम मोजली. केकेआर संघाच्या ताकद आणि कमजोरींचा विचार करता संघ तसा बऱ्यापैकी स्थिर आहे.
अष्टपैलू खेळाडू सर्वात मोठी ताकद
केकेआर संघाचा विचार करता त्यांची सर्वात मोठी ताकद त्यांचे अष्टपैलू खेळाडू आहे. यात स्टार आंद्रे रस्सेलसोबत नवखा पण दमदार वेंकटेश अय्यर आहे. सुनील नारायण, मोहम्मद नबी, सॅम बिलिंग्स यांच्या जोडीला असल्याने संघ अष्टपैलू कामगिरी उत्तम करु शकेल. त्यामुळे संघात मधली आणि धडाकेबाज सलामीवीरांची भूमिका उत्तम असेल हे नक्की.
फलंदाजी गोलंदाजीसह फलंदाजीही स्थिर
संघाच्या फलंदाजीचा विचार करता शुभमनच्या बाहेर जाण्याने सलामीला नवे खेळाडू येणार हे नक्की. संघाकडे आरॉन फिंचसोबत नारायण किंवा वेंकटेश अय्यर यांना सलामीला पाठवण्याचा पर्याय आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंह, सॅम बिलिंग्स असे फलंदाज आहेत. गोलंदाजीचा विचार करता पॅट कमिन्स, टीम साऊदी या दमदार जोडीसह, वरुण आणि नारायणच्या फिरकीची जादू संघाकडे आहे. तसंच वेंकटेश अय्यर, रस्सेल यांच्यासारखे अष्टपैलूही संघाकडे गोलंदाजीची जबाबदारी सांभाळण्यासाठी आहे.
कर्णधारपदाचा दुष्काळ संपणार का?
गौतम गंभीरने संघाला दोन वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकवून दिली. पण त्यानंतर संघाला एक चांगलं नेतृत्त्व मिळालेलं नाही. मॉर्गन, कार्तिक अशा दोघांनाही खास कामगिरी करता आलेली नाही. पण यंदा केकेआरने कोट्यवधी खर्चून युवा श्रेयसला संघात घेतलं आहे. श्रेयसकडे आयपीएलमध्ये दिल्ली संघाचं कर्णधारपद सांभाळण्याचा अनुभव देखील आहे. त्यामुळे त्याची कर्णधारी संघाला ट्रॉफी मिळवून देणार का? हे पाहावे लागेल. श्रेयसला बॅकअप म्हणून अनुभवी अजिंक्य रहाणे देखील संघात आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ
आंद्रे रस्सेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख), अशोक शर्मा (55 लाख), सॅम बिलिंग्स (2 कोटी), आरॉन फिंच (1.5 कोटी), टीम साऊदी (1.5 कोटी), रमेश कुमार (20 लाख), मोहम्मद नबी (1 कोटी), उमेश यादव (2 कोटी), अमान खान (20 लाख)
हे ही वाचा-
- Gujrat Titans Team Preview : पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज, हार्दिकच्या टोळीची काय ताकद? काय कमजोरी?
- RCB Team Preview IPL 2022 : सर्वोत्तम फलंदाज, दर्जेदार गोलंदाज; आरसीबी आता तरी चषक उंचवणार का?
- IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha