एक्स्प्लोर
नेहरा म्हणतो ते 2 खेळाडू सर्वात चलाख, एक म्हणजे धोनी, दुसरा...
नवी दिल्लीचं फिरोजशहा कोटला स्टेडियम हे नेहराचं माहेरघर आहे. त्यामुळं दिल्लीतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात खेळून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करण्याची संधी आहे.
![नेहरा म्हणतो ते 2 खेळाडू सर्वात चलाख, एक म्हणजे धोनी, दुसरा... ashish nehra call Dhoni & Ajay two players who have shrewdest cricket brain नेहरा म्हणतो ते 2 खेळाडू सर्वात चलाख, एक म्हणजे धोनी, दुसरा...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24152206/nehra2232016.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा, आज न्यूझीलंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.
नवी दिल्लीचं फिरोजशहा कोटला स्टेडियम हे नेहराचं माहेरघर आहे. त्यामुळं दिल्लीतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात खेळून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करण्याची संधी आहे.
38 वर्षांच्या नेहरानं आजवर 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. नेहराच्या 18 वर्षांच्या कारकीर्दीला वारंवार दुखापतींचं ग्रहण लागलेलं पाहायला मिळालं. त्यामुळं या 18 वर्षात त्याला बारा शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं आहे.
19 वर्ष फलंदाजांवर कोसळत राहिला
आशिष नेहराने भारतीय संघाची पांढरीशुभ्र जर्सी पहिल्यांदा परिधान केली तो दिवस होता दिनांक 24 फेब्रुवारी 1999. त्या वेळी त्याने श्रीलंका दौऱ्यातल्या कोलंबो कसोटीत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या निमित्ताने नेहरा टीम इंडियाची निळी जर्सी पुन्हा परिधान करेल, त्यावेळी त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला प्रवास एकोणिसाव्या वर्षात दाखल झालेला असेल.
या एकोणीस वर्षांत नेहरा हा प्रामुख्याने मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहली अशा आठ कर्णधारांचं वेगवान अस्त्र म्हणून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर कोसळत राहिला.
...ते दोन चलाख खेळाडू
दरम्यान, आशिष नेहराने त्याच्या कारकिर्दीत पाहिलेल्या दोन खेळाडूंना सर्वात चलाख म्हटलं आहे. हे खेळाडू म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अजय जडेजा होय.
नेहरा म्हणाला, “अजय जडेजाच्या क्रिकेट कौशल्याचा मी खूपच सन्मान करतो. माझ्यासाठी एम एस धोनी आणि अजय जडेजा हे क्रिकेट जगतातील सर्वात हुशार बुद्धीमत्तेचे खेळाडू आहेत”
संबंधित बातम्या
19 वर्षात 12 शस्त्रक्रिया, तरीही नेहरा खेळत राहिला!
नेहराच्या जिद्दीला सलाम ठोकायचा तर आजच्या सामन्यात विजय हवाच!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)