Wrestler Arman Wins Gold: भारताचा कुस्तीपटू अमन शेरावतनं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला, बनला पहिलाच भारतीय
U23 World Wrestling Championships 2022: या स्पर्धेत ऑलिम्पिक पदकविजेते रवी दहिया (Ravi Dahiya) आणि बजरंग पुनिया यांनी (Bajrang Punia) रौप्यपदक जिंकलं होतं.
U23 World Wrestling Championships 2022: स्पेनमध्ये सुरु असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन शेरावतनं (Aman Sehrawat) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचलाय. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अमन हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरलाय. त्यानं 57 किलो वजनी गटात तुर्कीच्या अहमत डुमनचा (Ahmet Duman) 12-4 असा पराभव केलाय. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदकविजेते रवी दहिया (Ravi Dahiya) आणि बजरंग पुनिया यांनी (Bajrang Punia) रौप्यपदक जिंकलं होतं.
अमननं दुसऱ्या पीरियडमध्ये आपले सर्व गुण मिळवले, तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याने प्रत्येक पीरियडमध्ये गुण मिळवले. या हंगामातील अमनचे ह चौथे पदक आहे. त्याने अल्माटीमध्ये सुवर्ण, डॅन कोलोव्हमध्ये रौप्य आणि यासार डोगूमध्ये कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे भारताने स्पर्धेत सहा पदके मिळवली, तर देशातील नऊ कुस्तीपटू मॅटवर उतरले. तीन कुस्तीपटूंनी कांस्यपदक जिंकून भारताने ग्रीकोरोमनमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.
ट्वीट-
Aman becomes the first Indian wrestler to win Gold Medal in the 57 kg category in Under-23 World Wrestling Championship being held in Spain.
— ANI (@ANI) October 23, 2022
भारताच्या पदकांमध्ये वाढ
अमननं याआधी उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेच्या हंसाना मदुशंकाचा 11-0 असा आणि उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तोशिया आबेचा 13-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यानं किरगिझस्तानच्या बेकजात अल्माझविरुद्ध त्यानं 10-5 असा विजय मिळवत आपलं पदक निश्चित केलं. परंतु अंतिम फेरीत त्यानं त्याचं सुवर्णात रूपांतर केलं. 23 वर्षाखालील जागतिक स्पर्धेत भारताचं हे सहावं पदक आहे.
भारतीय कुस्तीपटूंची दमदार कामगिरी
अमनच्या सुवर्णपदकासह भारताच्या पदकतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. कारण अंकुशनं महिला कुस्ती 50 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. मानसी अहलावतनं महिला कुस्तीत 59 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं. तर, नितेश आणि विकास यांनी ग्रीको-रोमन शैलीत अनुक्रमे 97 किलो आणि 72 किलो गटात कांस्यपदक जिंकलं. दरम्यान, या स्पर्धेत पदक जिंकणारा साजन भानवाला पहिला भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला.
हे देखील वाचा-