Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बँकेचे ब्रँच मॅनेजर आणि खातेदाराध्ये चांगलीच फाईट लागल्याचं दिसून येत आहे
अहमदाबाद : बँकेतील कर्मचारी आणि खातेदारांचा वाद नवा नाही. बँकेतील (Bank) कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी वागणूक नेहमीच चर्चेचा विषय बनते. अनेकदा बँक कर्मचाऱ्यांचा लंच ब्रेक सोशल मीडियावर मिम्सद्वारे व्हायरलही होत असतो. तर, कर्मचारी व खातेदारांमध्ये होणारी भांडणही यापूर्वीच समोर आली आहेत. आता, गुजरातच्या अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा बँकेतील वादाची घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे. बँक मॅनेजर आणि खातेदारामध्ये बँक खात्यातील रक्कम कपात झाल्यावरुन शाब्दीक वाद झाला. मात्र, हा शाब्दीक वाद चक्क हाणामारीत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर (Social viral) व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बँकेचे ब्रँच मॅनेजर आणि खातेदाराध्ये चांगलीच फाईट लागल्याचं दिसून येत आहे. तर, संतप्त झालेल्या ग्राहकांस आपल्या मॅनेजरपासून दूर करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न बँकेतील इतर कर्मचारी करत असल्याचे पाहायला मिळते. या व्हिडिओव नेटीझन्सही कमेंट करुन आपली प्रतिक्रिया देत आहेत. कोणी बँक मॅनेजरची बाजू घेत आहेत, तर काहीजण खातेदाराच्या अरेरावीवर भाष्य करत आहेत. कमेंट करुन खातेदाराच्या आर्थिक ज्ञानासंदर्भातही भाष्य केलं जात आहे.
गुजरात समाचार या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, वस्त्रनगर येथील प्रेमचंद नगरच्या युनियन बँक शाखेत हा गोंधळ घडला आहे. टीडीएस कपातीच्या मुद्द्यावरुन बँक मॅनेजर आणि खातेदारामधील वाद टोकाला गेला. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली आहे. जयमन रावल नावाच्या खातेदाराने बँक मॅनेजर सौरभ सिंह आणि एसयुडी लाईफ इन्शुरन्स कर्मचारी शुभम जैन यांच्यासोबत मारहाण केली होती. शुभम नावाच्या बँक कर्मचारीसोबत वाद घालत असताना बँक मॅनेजर मध्यस्ती करण्यासाठी येतात. त्यावेळी, खातेदार आणि बँक मॅनेजर यांच्यातच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. 44 सेकंदाचा मारहाण व गोंधळाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकजण कमेंट करुन या वादाची मजादेखील घेत असल्याचं दिसून येतं. विविध ट्वटिर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून नेटीझन्स कमेंट करत आहेत.
'Customer' turned 'Crocodile' after TDS Deduction in Bank FD. FM sud instruct Bank staffs to learn 'taekwondo' for self defense. pic.twitter.com/CEDarfxcqi
— Newton Bank Kumar (@idesibanda) December 6, 2024
दरम्यान बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट रक्कमेत कपात करण्यात आलेल्या टीडीएसवरुन ग्राहक संतापलेला दिसून येतो. त्यावरुनच हा वाद टोकाला गेला आहे. दरम्यान, याप्रकरणी बँक मॅनेजरच्या तक्रारीवरुन स्थानिक पोलीस ठाण्यात खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा