एक्स्प्लोर
मुंबई टी-20 लीगमधून अर्जुन तेंडुलकरची माघार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबई टी-20 लीगमधून आपलं नाव मागे घेतलं आहे.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबई टी-20 लीगमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. 11 मार्चपासून मुंबई टी-20 लीग सुरु होणार आहे. आपण या लीगसाठी तयार नसल्याचं सांगत अर्जुनने आपलं नाव मागे घेतलं आहे.
सचिन तेंडुलकर यां टी-20 लीगचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार असं म्हटलं जात आहे की, अर्जुनने हा निर्णय वडिलांच्या सल्ल्याने घेतला आहे. सध्या अर्जुन क्रिकेटमधील बारकाव्यांवर प्रचंड मेहनत घेत आहे. तसेच त्याच्या कामगिरीत बरीच सुधारणाही झाली आहे. पण मागील वर्षी अर्जुन बराच वेळ दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळेच सचिनला असं वाटतं की, अर्जुनने पुन्हा दुखापतग्रस्त होऊन क्रिकेटपासून लांब जाऊ नये.
दरम्यान, अर्जुन तेंडुलकरनेही या लीगमधून आपलं नाव मागे घेतल्याने आयोजक मात्र चितेंत पडले आहेत. कारण की, याच लीग दरम्यान, मुंबईचे काही स्टार खेळाडू श्रीलंकेतील टी-20 तिंरगी मालिकेसाठी टीम इंडियाच्यासोबत जाणार आहेत. तर काही जण हे इराणी ट्रॉफीसाठी तयारी करत आहेत.
याचवेळी अर्जुन तेंडुलकरनेही आपलं नाव मागे घेतल्याने आयोजकांच्या चिंतेत भर पडली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement