Time Magazine Athlete of the Year : अमेरिकेची जिम्नास्ट सिमोन बाइल्सचं मोठं यश, टाईम मॅगझिनकडून 'अॅथलीट ऑफ द इयर' म्हणून घोषित
टाईम मॅगझिनने यंदाच्या वर्षी अॅथलीट ऑफ द इयर म्हणून अमेरिकेची जिम्नास्ट सिमोन बाइल्स हिचा सन्मान केला आहे.
Time Magazine Athlete of the Year : ऑलिम्पिक खेळांमध्ये (Olympic Games) अनेक पदकं पटकावणारी अमेरिकेची जिम्नास्ट सिमोन बाइल्स (Simone Biles) हीचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. तिला जगातील आघाडीचं मॅगझिन असणाऱ्या टाईम मॅगझिनने (TIME Magzine) 2021 अॅथलिट ऑफ द इयरने ( Athlete of the Year 2021) सन्मानित केलं आहे. जिमनास्ट खेळांमध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सिमोन हिने अमेरिकेसाठी अनेक पदकं पटकावली आहेत. यामध्ये ऑलिम्पिक पदकांचाही समोवेश आहे.
सिमोनने जिमनास्टमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे तिला जिमनास्ट खेळांमधील दिग्गज मानलं जातं. आतापर्यंत ऑलिम्पिक खेळांमध्ये सात आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 25 पदकं पटकावली आहेत. त्यामुळे सिमोनाला अमेरिकेसह जागतिक जिमनास्टीक
विश्वात मोठा मान आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमधून माघार
आतापर्यंत बऱ्याच ऑलिम्पिक खेळांमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सिमोनने यंदा पार पडलेल्या ऑलिम्पिक खेळांमधून मात्र माघार घेतली होती. तिने मानसिक स्वास्थ ठिक नसल्याचं सांगत यंदाच्या ऑलिम्पिक खेळातून माघार घेतली होती. तिने चार मोठ्या स्पर्धांच्या फायनल स्पर्धांतून माघार घेतली होती.
इलॉन मस्क '2021 पर्सन ऑफ द इयर'
टाईम मॅगझिनने (TIME Magzine) 2021 पर्सन ऑफ द इयर (Person Of The Year 2021) हा सन्मान जगप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांना दिला आहे. मस्कआधी मागील वर्षी हा सन्मान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरीस यांना मिळाला होता. पण यंदा मस्कच्या व्यावसायिक तसंच तांत्रिक क्षेत्रातील अप्रतिम कामगिरीमुळे हा मान त्यांना मिळाला आहे.
हे ही वाचा :
- Elon Musk Update : इलॉन मस्क '2021 पर्सन ऑफ द इयर', टाईम मॅगझिनकडून मोठा सन्मान
- Miss Universe 2021 : विश्वसुंदरी हरनाज संधू आधी 'या' भारतीय सुंदरीनी पटकावलाय किताब
- Vodafone Idea New Tariff : एअरटेलनंतर व्हीआयचाही रिचार्ज महागला, जाणून घ्या व्हीआयचे नवे प्लॅन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha