एक्स्प्लोर
सिंधू तू क्रिकेटप्रेमी देशाला बॅडमिंटन पाहायला लावलंस- अक्षय कुमार

मुंबईः बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर तिच्यावर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. खिलाडी अक्षय कुमारनेही तिच्यासोबतचा जुना फोटो शेअर करत खास कौतुक केलं आहे. क्रिकेटप्रेमी देशाला तू बॅडमिंटन पाहायला लावलंस, तू पदक मिळवणार हे माहितचं होतं, अशा शब्दात अक्षय कुमारने सिंधूचं कौतुक केलं आहे. सोबतच बॅडमिंटन कोर्टवर तिच्यासोबत खेळतानाचा फोटोही शेअर केला आहे. https://twitter.com/akshaykumar/status/766877387309154304 सिंधूने महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटन खेळाडू कॅरोलिना मरिनचा मुकाबला केला. या सामन्यात सिंधूला पराभव स्विकारावा लागला असला तरी तिने रौप्य पदकाची कमाई करत भारतीय बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास रचला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















