(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंचा 'मेरे देश की धरती'वर डान्स
कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियानं मैदान गाजवल्यानंतर हॉटेलमध्येही डान्स करत सेलिब्रेशन केलं. दोघांसह टीम इंडियाचे शिलेदार 'मेरे देश की धरती' हा गाण्यावर बेभान होऊन नाचले.
सिडनी : विराट कोहलीच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला पहिला कसोटी मालिका विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला. पाचव्या दिवसाच्या खेळावर पावसानं पाणी फेरलं आणि सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे टीम इंडियाची किंचित निराशा झाली. पण विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांनी सिडनी क्रिकेट ग्राऊंडला फेरी मारून आपल्या चाहत्यांना अभिवादन केलं.
मग हॉटेलमध्ये पुन्हा जल्लोष करून, त्यांनी आपला ऐतिहासिक विजय साजरा केला. कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियानं मैदान गाजवल्यानंतर हॉटेलमध्येही डान्स करत सेलिब्रेशन केलं. दोघांसह टीम इंडियाचे शिलेदार 'मेरे देश की धरती' हा गाण्यावर बेभान होऊन नाचले. मग काहींनी चक्क नागिन डान्सही केला.
Had only dreamt of watching such scenes after a series win in Australia. Thank you @imVkohli and co for making this happen :) pic.twitter.com/Xr0DUL6Cgn #AUSvIND
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) January 7, 2019
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर प्रथम हार्दिक पांड्याने डान्स सुरु केला. त्यानंतर विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनीही गाण्यावर ठेका धरत आपला आनंद साजरा केला. आपले प्रशिक्षक आणि कर्णधार डान्स करत असताना इतर खेळाडू मागे का राहतील. माग इशांत शर्मा, रिषभ पंत, केएल राहुल यांच्यासह इतर खेळाडू ऐतिहासिक विजय साजरा करण्यात धुंद झाले.
टीम इंडियाने तब्बल 70 वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी खिशात घातली.
संबंधित बातम्या
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियात 'विराट' विजय
भारताने 70 वर्षांनी इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका विजय