एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आगामी विश्वचषकावर नजर, डिव्हिलियर्सची कसोटीतून विश्रांती
लंडन : दक्षिण आफ्रिकेची वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या प्रतिष्ठेच्या विजेतेपदाची प्रतीक्षा इतकी वाढत चाललीय की, त्यांच्या वन डे संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून विश्रांतीचा निर्णय घेतला आहे.
2019 साली इंग्लंडमध्ये होत असलेला विश्वचषक हेच आपल्या उर्वरित कारकीर्दीचं मुख्य लक्ष्य असल्याचं त्याने जानेवारीत स्पष्ट केलं. 2019 सालच्या विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे साहजिकच डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यासाठी उत्सुक असेल.
दक्षिण आफ्रिकेने 1998 साली आयसीसी नॉकआऊट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर या स्पर्धेचं चॅम्पियन्स ट्रॉफी असं नामकरण करण्यात आलं. पण दक्षिण आफ्रिकेला आजतागायत चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा वन डेचा विश्वचषक जिंकता आलेला नाही.
किंबहुना अनेकदा आपल्या लक्ष्याच्या जवळ जाऊन हरणारा संघ म्हणून दक्षिण आफ्रिकेची खिल्ली उडवण्यात येते. पण यंदा आपल्या टीकाकारांना कामगिरीने उत्तर देण्याचा डिव्हिलियर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहिल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement