दिनेश रामदिन, देवेंद्र बिशू, सुनील नारायण : वेस्ट इंडिजचे सध्याच्या पिढीत दिनेश रामदिन, देवेंद्र बिशू आणि सुनील नारायण हे भारतीय वंशाचे खेळाडू मैदान गाजवताना दिसत आहेत. पण दिनेश रामदिनवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्यामुळं सध्या तो संघाबाहेर आहे. तर सुनील नारायण हा केवळ 20-20 क्रिकेटमध्येच खेळताना दिसतो. केवळ देवेंद्र बिशू भारताविरुद्ध कसोटी मालिकेत खेळतो आहे. बिशूनं अँटिगा कसोटीत पहिल्या डावात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केलं होतं, तर दुसऱ्या डावात त्यानं 45 धावांची खेळीही केली होती.
2/6
अल्विन कालिचरण : 70 च्या दशकातला वेस्ट इंडीजचा धाडसी फलंदाज अशी अल्विन कालिचरण यांची ओळख आहे. कालिचरण यांनी 66 कसोटी सामन्यांत 12 शतकं आणि 21 अर्धशतकांसह 4 हजार 399 धावा करण्याचा पराक्रम गाजवला होता.
3/6
शिवनारायण चंदरपॉल : विंडीजच्या नव्या पिढीत ब्रायन लारानंतरचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून शिवनारायण चंदरपॉलचं नाव घेतलं जातं. चंदरपॉलनं 164 कसोटी सामन्यांत विंडीजचं प्रतिनिधित्त्व केलं. त्याच्या खात्यात कसोटीत 30 शतकं आणि 66 अर्धशतकांसह 11 हजार 867 धावा जमा आहेत. चंदरपॉलनं 268 वन-डे सामन्यांत 11 शतकं आणि 59 अर्धशतकांसह 8 हजार 778 धावा केल्या. फलंदाजी करताना काहीसा वेगळा स्टान्स आणि डोळ्यांच्या खाली लावलेले सनस्क्रीन स्टिकर्स ही चंदरपॉलची ओळख बनली.
4/6
रामनरेश सरवान : शिवनारायण चंदरपॉलच्या साथीनं रामनरेश सरवाननंही विंडीजच्या फलंदाजीची धुरा सांभाळली होती. सरवाननं 87 कसोटी सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीनं 5 हजार 842 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या नावावर 15 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. तर सारवानच्या खात्यात 181 वन-डे सामन्यांमध्ये 5 हजार 804 धावा जमा आहेत.
5/6
रोहन कन्हाय : वेस्ट इंडिजच्या महानतम फलंदाजांमध्ये रोहन कन्हाय यांची गणना केली जाते. कन्हाय यांनी वेस्ट इंडिजकडून 79 कसोटी सामन्यांत 15 शतकं आणि 28 अर्धशतकांसह 6 हजार 227 धावांचा रतीब घातला. 1975 च्या विश्वचषक विजेत्या कॅरिबियन टीमचेही ते सदस्य होते. लॉर्डवर झालेल्या फायनलमध्ये रोहन कन्हाय यांनी 55 धावांची खेळी केली. कन्हाय यांनी वेळप्रसंगी यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळली होती.
6/6
सोनी रामदिन : सोनी रामदिन हे वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्त्व करणारे भारतीय वंशाचे पहिले क्रिकेटर होते. 1950च्या दशकात रामदिन वेस्ट इंडिजकडून खेळले. लॉर्डसवर विंडीजच्या पहिल्या कसोटी विजयात रामदिन यांनी 11 विकेट्स काढून मोलाची भूमिका बजावली होती. सोनी रामदिन यांनी 1957 साली एजबॅस्टन कसोटीत एकाच डावात तब्बल 98 षटकं गोलंदाजी केली होती. रामदिन यांच्या नावावर 43 कसोटी सामन्यांत 158 विकेट्स जमा आहेत. 49 धावांत सात विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.