एक्स्प्लोर
हा आहे जगातील सर्वात मोठा वडापाव!
1/4

वडापावला आपण मराठी माणसं खूपच लाईटली घेतो. पण त्याचं महत्व महाराष्ट्राच्या बाहेर आल्यावर कळतं. या महोत्सवात गर्दी केलेल्या दिल्लीकरांना विचारा ते किती मिस करतात आपला वडापाव. अशा पद्धतीनं वडापाव दिन दिल्लीत साजरा झाला…निमित्त काहीही असेना, पण त्यानिमित्तानं महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती बाहेर पोहचते आहे. वडापावची दखल बड्या बड्या कॉर्र्पोरेट जायंटसनाही घ्यावीशी वाटते आहे, हे जास्त महत्वाचं आहे.
2/4

23 ऑगस्ट 2001 ला धीरज गुप्ता या व्यक्तीनं वडापावला इंडियन बर्गरचं रुप देत, जंबो वडापाव फूड चेन सुरु केली. त्यानिमित्तानंच त्यांच्या 9 शहरातल्या शाखा हा जागतिक वडापाव दिन साजरा करतात. इतरांनीही त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली आहे. वडापाव हे खरंतर सामान्यांचं फूड. मुंबईत गिरणी कामगारांच्या संस्कृतीत हे पटकन रुजलं. खायला काही प्लेट लागत नाही ना चमचा. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो. त्यामुळेच मुंबईच्या कामगार संस्कृतीची तो ओळख बनला. आज मुंबईत दिवसाला जवळपास 18 ते 20 लाख वडापाव खपतात.
Published at : 24 Aug 2016 04:12 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
नाशिक
सोलापूर
व्यापार-उद्योग























