राष्ट्रपतीपदाची निवडणूक अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेली असतानाही भाजपनं आपले पत्ते उघड केलेले नाही. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचं उमेदवार कोण असणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या नावांबाबत चर्चा सुरु आहे.
5/6
राष्ट्रपतीपदासाठी एकमत होऊ शकलं नाही तर 17 जुलैला मतदान आणि 20 जुलैला निकाल जाहीर होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपणार आहे.
6/6
देशाचे 14 वे राष्ट्रपती निवडण्यासाठीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मोदी विरुद्ध सगळे अशा आणखी एका लढाईसाठी या निवडणुकीच्या निमित्तानं मैदान सज्ज झालं आहे. त्यामुळे यंदा मोदी कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे.