दादरजवळ तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक रखडली. त्यामुळे दादर स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
2/4
दरम्यान, बॅटरी चोरीला गेल्यानेच ही वाहतूक ठप्प झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही बॅटरी खूप मोठी असते त्यामुळे ही बॅटरी स्टेशनवरुन चोरीला गेलीच कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.
3/4
पश्चिम रेल्वे मार्गावरील अप-डाऊन, फास्ट – स्लो सर्व वाहतूक रखडली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळीच प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकलमधील पंखे, लाईट्सही बंद करण्यात आली आहे.
4/4
पहिल्याच पावसानंतर मुंबईकरांची लाईफलाईन डळमळली आहे. कारण मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल विस्कळीत झाली आहे. पश्चिम मार्गावर तर दोन्ही बाजूने रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.