ट्वीटच्या या चर्चेनंतर परिणीतीने एक व्हिडिओ शेअर करुन अखेर हा सर्व सस्पेंस दूर केला. आपण ज्या 'अमेझिंग पार्टनर'विषयी बोलत होतो, तो शाओमीचा आगामी फोन आहे, असं परिणीतीने स्पष्ट केलं.
2/7
या दोघांच्या चर्चेची सुरुवात एका ट्वीटपासून झाली. परिणीतीने एक सायकलसोबतचा फोटो शेअर करत 'परफेक्ट पार्टनरसोबत अमेझिंग ट्रिप' असं कॅप्शन दिलं होतं.
3/7
परिणीतीनेही पंड्याला रिप्लाय दिला. ''असं म्हणूही शकतो किंवा नाही, पण सध्यातरी सगळं रहस्य याच फोटोमध्ये दडलेलं आहे'', असं परिणीती म्हणाली.
4/7
हार्दिक पंड्याने या ट्वीटला रिप्लाय दिला. ''मी याचा अंदाज लावू शकतो का? बहुतेक ही क्रिकेट आणि बॉलिवूडची दुसरी लिंक आहे", असं पंड्याने रिप्लायमध्ये दिलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं.
5/7
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं जुनं नातं आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या अफेअरचे अनेक किस्से आपण पाहिले आहेत.
6/7
नवाब मन्सूर अली खान, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंह आणि हरभजन सिंह असे टीम इंडियाचे अनेक खेळाडू बॉलिवूड अभिनेत्रींसोबत विवाहबद्ध झाले. तर अलीकडच्याच काळात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं अफेअरही चर्चेत आहे.
7/7
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा ट्विटरवरील संवाद पाहून दोघांच्या अफेअरचीही चर्चा सुरु झाली.