नेहमीप्रमाणेच शेतकऱ्यांमध्ये पोळ्याचा प्रचंड उत्साह जाणवत आहे. त्यातच एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने आनंदाचं वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे आजही पाऊस येणार का, याकडे बळीराजाचं लक्ष आहे.
13/14
आधुनिक युगात सध्या सर्वच हायटेक झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा खरा साथीदार बैल गायब झाल्याचं चित्र आहे. त्याकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीनेही हा ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. यामध्ये गावातील सर्व ट्रॅक्टर मालकांनी सहभाग घेतला.
14/14
बुलडाणाः शेती कामात बैलाप्रमाणेच सध्या ट्रॅक्टरला देखील तेवढच महत्व प्राप्त झालं आहे. लवकरात लवकर काम आटोपण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरला प्राधान्य देतात. त्यामुळे आज पोळ्याच्या दिवशी बुलडाण्यात अनोख्या पद्धतीने ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात सकाळपासून पोळ्याची लगबग पाहायला मिळत आहे