एक्स्प्लोर
शोएबने मला आणि युवराजला बंद खोलीत चोपलं होतं : हरभजन
1/4

"शोएबने मला षटकार ठोकण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर मी पुढच्याच चेंडूवर सिक्सर ठोकला. मग काय, संतापलेल्या शोएबने मला सलग दोन बाऊंसर टाकले. पण मैदानातून बाहेर येताच दोघांमध्ये सगळं आलबेल झालं," असंही हरभजन सिंहने सांगितलं.
2/4

या घटनेबाबत हरभजन सिंह म्हणाला की, "तुझ्या खोलीत येऊन चांगलाच चोप देईन, अशी धमकी एकदा शोएबने मला दिली होती. त्यावर माझ्या खोलीत ये, तेव्हा पाहुया कोण कोणाला मारतं, असं उत्तर मी दिलं होतं. पण मी फारच घाबरलो होतो. तो धष्टपुष्ट होता. एकदा शोएबने मला आणि युवराजला मारहाण केली होती. तो धिप्पाड असल्याने त्याला आवरणं कठीण होतं."
3/4

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने मला आणि युवराज सिंहला बंद खोलीत चोपलं होतं, असा खळबळजनक खुलासा हरभजन सिंहने 'आप की अदालत'मध्ये केला आहे.
4/4

हरभजन सिंहचं नाव ऐकताच शानदार स्पिनसह आणखी एक बाब समोर येते, ती म्हणजे वाद. सायमंड्सपासून श्रीशांतपर्यंत, भज्जीच्या वादांची यादी मोठी आहे. आता यामध्ये आणखी एका वादाची भर पडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हरभजनने जो खुलासा केला आहे त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसून शकतो.
Published at : 04 Jul 2016 12:10 PM (IST)
View More























