एक्स्प्लोर
संगकाराच्या ड्रीम टीममध्ये सचिनऐवजी या दिग्गज खेळाडूला जागा!
1/14

क्रिकेटच्या दुनियेतीली अनेक दिग्गज आपली ड्रीम टीम बनवत आहेत. आता श्रीलंकेचा माजी क्रिकेटर कुमार संगकारानंही आपली ड्रीम टीम बनवली आहे. या ड्रीम टीममध्ये त्यांनी अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडद्वारा आपल्या सोशल मीडियाच्या पेजवर संगकारानं आपले बेस्ट अकरा खेळाडू निवडले आहेत.
2/14

अक्रमसोबतच संगकारानं चामिंडा वासला निवडलं आहे.
3/14

तर जलद गोलंदाजीमध्ये वसीम अक्रमची निवड करण्यात आली आहे.
4/14

स्पिन गोलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी या संघात मुरलीधरनचा समावेश करण्यात आला आहे.
5/14

आठव्या क्रमाकांवर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न असेल.
6/14

सातव्या क्रमांकावर विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्ट असेल.
7/14

तर सहाव्या क्रमांकासाठी द. आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिस असेल.
8/14

यानंतर कर्णधार डि सिल्वा बॅटिंगसाठी उतरेल.
9/14

लारा नंतर चौथा क्रमाकांवर रिकी पॉन्टिंगची निवड करण्यात आली आहे.
10/14

तिसऱ्या क्रमांकावर ब्रायन लाराला निवडण्यात आलं आहे.
11/14

तर ओपनर म्हणून त्यानं ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनला निवडलं आहे. तर दुसरीकडे दुसरा सलामीवीर म्हणून त्यानं भारताच्या 'द वॉल' म्हणजेच राहुल द्रविडची निवड केली आहे.
12/14

संगकारानं अरविंद डि सिल्वा याला कर्णधार म्हणून निवडलं आहे.
13/14

हे अकरा खेळाडू निवडताना संगकारानं सगळ्यात आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. या संघात त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश केलेला नाही. संगकारानं सचिनला नाही तर एका दुसऱ्या एका भारतीय दिग्गज खेळाडूला स्थान दिलं आहे.
14/14

संगकारानं बेस्ट इलेव्हनमध्ये सर्वाधिक ऑस्ट्रेलितील 4, श्रीलंकेतील 3, भारत, वेस्टइंडिज, पाकिस्तान आणि द. आफ्रिकेतील 1-1 खेळाडू निवडला आहे.
Published at : 29 Jun 2016 03:28 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम























