एक्स्प्लोर
आमीर लव्ह यू पर्सनली, बट हेट यू प्रोफेशनली : सलमान खान

1/6

"माझं कुटुंब दंगल पाहण्यास गेलं होतं. त्यांच्या मते सुलतानपेक्षा दंगल खूपच चांगला सिनेमा आहे. आमीर तू वैयक्तिक जीवनात मला आवडतोस, मात्र व्यावसायिक जीवनात मी तुझा तिरस्कार करतो" असं ट्विट सलमानने केलं.
2/6

दंगल हा सिनेमा कुस्तीपटू महावीरसिंह फोगट यांच्यावर आधारित आहे. यापूर्वी सलमान खाननेही कुस्तीवर आधारित सुलतान हा सिनेमा केला होता.
3/6

दंगल या सिनेमात आमीर खानशिवाय सांक्षी तन्वर, फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत.
4/6

दंगलच्या स्क्रीनिंगला सलमान खानच्या कुटुंबाने हजेरी लावली. त्यानंतर सलमानने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
5/6

यावर आमीर खाननेही त्याच्या स्टाईलने सलमानला रिप्लाय दिला. आमीरने 'देल्ली बेल्ली' गाण्याचा आधार घेत, "सल्लू, तुझ्या तिरस्कारातही मला प्रेम दिसतं. आय लव्ह यू लाईक आय हेट यू" असं ट्विट केलं
6/6

प्रदर्शनापूर्वीच तुफान चर्चेत असलेल्या आमीर खानचा दंगल सिनेमा अखेर आज रिलीज झाला आहे. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला दंगल, प्रेक्षकांचीही मनं जिंकेल, असा विश्वास दंगल टीमला आहे.
Published at : 23 Dec 2016 01:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
भारत
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
