‘सलमान आणि कतरिनाने सुपरस्टार म्हणून स्वत:ला इंडस्ट्रीत प्रस्थापित केलं आहे. पण त्यानंतरही ते दोघेही विनम्र स्वभावाचे आहेत. हेच त्यांच्या फॅशन मध्येही दिसून येतं,’असं मनीष मल्होत्राने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)
2/8
सलमान आणि कतरिना लवकरच 'भारत' या सिनेमात एकत्र दिसतील. एक सुशील आणि सुंदर मुलगी, जिचं नाव आहे कतरिना कैफ... ‘भारत’मध्ये स्वागत आहे तुझं,’असं म्हणत सलमानने भारत सिनेमात कतरिनाचं स्वागत केलं. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)
3/8
प्रियांका चोप्रा ‘भारत’ सिनेमातून बाहेर पडल्यानंतर कतरिनाची सिनेमात एंट्री झाली आहे. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)
4/8
सलमान खान आणि कतरिना ही जोडी याआधी 'टाइगर जिंदा है' या सिनेमात एकत्र दिसली होती. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)
5/8
सलमान-कतरिना ही जोडी एकत्र दिसण्याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)
6/8
सलमान-कतरिनाच्या रॅम्पवॉकला चाहत्यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)
7/8
सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वात बहुचर्चित जोडी राहिली आहे. काही दिवसांपासून काहीशी बाजूला पडलेली ही जोडी रॅम्पवॉकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)
8/8
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी सलमान आणि कतरिनाने रॅम्पवॉक केला. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)