रिलायन्स जिओने सप्टेंबर 2016 मध्ये वेलकम ऑफर आणत 4G इंटरनेट सेवेत एक मोठा बदल घडवून आणला. ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत मोफत डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सेवा मिळणार होती. मात्र रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या ऑफरला हॅप्पी न्यू ईयर नाव देत ही ऑफर 31 मार्च 2017 पर्यंत वाढवण्यात आली.
2/7
देशात 4G इंटरनेट सेवेत मोठा बदल घडवून आणल्यानंतर रिलायन्स जिओ आता स्वस्त दरात 4G फीचर फोनही उपलब्ध करुन देणार आहे. या 4G फोनची किंमत 1 हजार रुपयांपेक्षाही कमी असेल, असं बोललं जात आहे.
3/7
दरम्यान रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेतही पाऊल ठेवल्याची माहिती आहे. मुंबईतून या सेवेची सुरुवात करण्यात आली असून ऑफरनुसार ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत हायस्पीड डेटा दिला जात आहे.
4/7
जिओ टू एअरटेल केलेल्या एक हजार कॉलपैकी 175 कॉल ड्रॉप होतात, असा खुलासाही रिलायन्सने केला आहे. ट्रायच्या नियमानुसार एक हजारपैकी 5 पेक्षा अधिक कॉल ड्रॉप करता येत नाहीत.
5/7
रिलायन्सला रोज लाखो ग्राहक मिळत असून 31 डिसेंबरपर्यंतच ग्राहकांची संख्या 7 कोटी 24 लाख एवढी झाली आहे, असं रिलायन्स जिओचे रणनितीकार आणि योजना प्रमुख अंशुमान ठाकूर यांनी सांगितलं. मात्र त्यांनी मोफत सेवा वाढवणार का, या प्रश्नावर मौन बाळगलं.
6/7
मार्च 2017 पर्यंत मोफत सेवा दिल्यानंतर ग्राहकांना पेड सेवा कधीपासून मिळेल, यावर कंपनीने अद्यापही मौन बाळगलेलं आहे. त्यामुळे रिलायन्सकडून मार्चनंतरही मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा मोफत दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे.
7/7
रिलायन्स जिओशी चार महिन्यात 7 कोटी 24 लाख ग्राहक जोडले गेले आहेत. वेलकम ऑफरनंतर प्रतिदिन 6 लाख ग्राहक जोडल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा आकडा मार्चपर्यंत 10 कोटींच्या पुढे जाऊ शकतो, असंही कंपनीने म्हटलं आहे.