आर. अश्विननं या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला. या सामन्यात त्यानं तब्बल 12 बळी घेतले.
2/7
याआधी अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिलीनं केली होती. त्यानं 48 कसोटीत 250 बळी घेतले होते. तर अश्विननं 43 कसोटीत 247 बळी घेतले आहेत.
3/7
अश्विननं अवघ्या 43 कसोटीत अश्विननं 247 बळी घेतले आहेत. त्यामुळे आताा त्याला 250चा टप्पा पार करण्यासाठी अवघ्या 3 विकेटची गरज आहे.
4/7
सर्वात कमी कसोटी सामने खेळून तब्बल 250 विकेट घेण्याचा विक्रम मोडण्याची संधी अश्विनजवळ आहे.
5/7
या सामन्यात अश्विनच्या फिरकीची कमाल पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्यानं या सामन्यात तब्बल 12 विकेट घेऊन एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
6/7
विराट कोहलीच्या संघानं आज या मालिकेत 3-0नं विजयी आघाडी घेऊन एक मोठा इतिहास रचला आहे.
7/7
कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक, जयंत यादव आणि मुरली विजयची शतकी खेळी तर आर. अश्विन आणि जाडेजाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारतानं मुंबई कसोटीत इंग्लंडवर एक डाव आणि 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तब्बल 43 वर्षानंतर पाच सामन्यांची मालिका भारतानं जिंकली आहे.