एक्स्प्लोर
कोहली, आफ्रिदी ते मोदी, कंदील बलोचची बेधडक वक्तव्य
1/7

आशिया कपमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बलोचने शाहिद आफ्रिदीवर जोरदार हल्ला चढवला होता. अभिनेत्री कंदील बलोचने लिहिलं होतं की, मी काय बोलले होते? जोपर्यंत हा वेडा शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार असेल, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही.
2/7

टी ट्वेण्टी वर्ल्डकपवेळी कोलकात्यातील ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा करणारी पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री कंदील बलोच प्रचंड नाराज झाली होती. भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ईडन गार्डनवर विजयी झेंडा रोवला. त्यामुळे अभिनेत्री कंदील बलोचने पाकिस्तानी खेळाडूंवर संतप्त होत एका व्हिडीओद्वारे नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीला निवृत्त होण्याचा सल्ला कंदील बलोचने दिला होता. शिवाय, वकार युनूसवर तर अत्यंत जोरदार टीका केली होती.
Published at : 16 Jul 2016 12:58 PM (IST)
Tags :
Qandeel BalochView More























