एक्स्प्लोर
अवघी दुमदुमली पंढरी
1/7

दरम्यान, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली होती. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला होता.
2/7

महापूजेवेळी जलसंपदामंत्री गिरिश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
3/7

आषाढी एकादशीनिमीत्त महाराष्ट्रच्या विविध भागातून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात.
4/7

'ज्ञानोबा-तुकोबा'च्या जयघोषात अवघी पंढरी दुमदुमली आहे.
5/7

शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचं यावेळी जाधव दाम्पत्यानं सांगितलं.
6/7

पंढरपुरात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत.
7/7

पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा सुरु असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात जाण्याचं टाळलं. विठ्ठलाच्या कृपेनंच आपण हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याचं ट्विटही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Published at : 23 Jul 2018 10:45 AM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पर्सनल फायनान्स
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement


















