एक्स्प्लोर
आयपीएल लिलाव : या भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/28105837/ipl-indian-players.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![1 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने 8 कोटींमध्ये खरेदी केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/28105846/sanju-samsan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने 8 कोटींमध्ये खरेदी केलं.
2/6
![आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज मनीष पांडेची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात मनीष पांडेला खरेदी करण्यासाठी स्पर्धा लागली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही यात उडी घेतली. मात्र अखेर सनरायझर्स हैदराबादने सर्वांवर मात करत मनीष पांडेला 11 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/28105844/manish-pandey.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज मनीष पांडेची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात मनीष पांडेला खरेदी करण्यासाठी स्पर्धा लागली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही यात उडी घेतली. मात्र अखेर सनरायझर्स हैदराबादने सर्वांवर मात करत मनीष पांडेला 11 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
3/6
![मुंबई इंडियन्सने 40 लाख रुपये बेस प्राईस असलेल्या कृणाल पंड्यावर तब्बल 8 कोटी 80 लाख रुपयांची बोली लावत त्याला खरेदी केलं. त्याला खरेदी करण्यासाठी मुंबईने राईट टू मॅचचा वापर केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/28105842/krunal-pandya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई इंडियन्सने 40 लाख रुपये बेस प्राईस असलेल्या कृणाल पंड्यावर तब्बल 8 कोटी 80 लाख रुपयांची बोली लावत त्याला खरेदी केलं. त्याला खरेदी करण्यासाठी मुंबईने राईट टू मॅचचा वापर केला.
4/6
![2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या लोकेश राहुलसाठी मुंबई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झुंज होती. शेवटी किंग्ज इलेव्हन पंजाबने राहुलला 11 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/28105841/kl-rahul.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या लोकेश राहुलसाठी मुंबई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झुंज होती. शेवटी किंग्ज इलेव्हन पंजाबने राहुलला 11 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.
5/6
![टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू केदार जाधवची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. चेन्नईने त्याला 7.80 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/28105839/kedar-jadhav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू केदार जाधवची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. चेन्नईने त्याला 7.80 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.
6/6
![यंदाच्या आयपीएल मोसमासाठी खेळाडूंचा पहिल्या दिवसाचा लिलाव संपला आहे. आपल्या आवडीचे खेळाडू निवडण्यासाठी आयपीएल फ्रँचायझींनी अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला. इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र भारतीय खेळाडूंवरही मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/28105837/ipl-indian-players.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या आयपीएल मोसमासाठी खेळाडूंचा पहिल्या दिवसाचा लिलाव संपला आहे. आपल्या आवडीचे खेळाडू निवडण्यासाठी आयपीएल फ्रँचायझींनी अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला. इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र भारतीय खेळाडूंवरही मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली.
Published at : 28 Jan 2018 11:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)