एक्स्प्लोर
कोल्हापुरात मिनीबस नदीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
1/5

अखेर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त मिनी बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आणि गाडीतील उर्वरित 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले. गाडीत एकूण 14 प्रवासी होते, यातील 12 मृतदेह काढण्यात आलेत तर 2 जखमींवर सीपीआर रुगणालायात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर पोलीस, फायरब्रिगेड, समाजसेवी संस्था आणि कोल्हापुरातील तरुणांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे 4 तास रेस्क्यू ऑपरेशन केलं. अद्यापही पंचगंगा नदी पात्रात मृतदेहाचा शोध सुरू आहे. अपघात झाल्याचं समजताच पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील , जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहेत.
2/5

गाडी कोसळल्याचा आवाज एकूण त्याच परिसरातील तरुणांनी बचावकार्य सुरु केलं. ही माहिती आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर पोलीस,फायरब्रिगेड, घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सुरुवातीला पाण्यात बुडालेल्या गाडीतील 7 जणांना काढण्यात यश आलं . परंतु तासभर प्रयत्न करून देखील मिनी बस गाळातच रुतून बसल्यामुळे गाडीतील इतर प्रवाशांना बाहेर काढता आलं नाही.
Published at : 27 Jan 2018 07:53 AM (IST)
View More























