नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आदींसाठी ही सोयीची गाडी आहे.
2/6
जिल्ह्यातील चाकरमान्यांची प्रमुख भिस्त असणारी रेल्वेगाडी म्हणून मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची ओळख आहे. नोकरी, व्यापार, तत्सम कारणांस्तव हजारो नागरिक या गाडीने प्रवास करतात.
3/6
रेल्वेने पंचवटी एक्स्प्रेसचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे नाशिककरांचा मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे.
4/6
रेल परिषदेने केलेल्या सूचना स्वीकारत, रेल्वेने नव्या रंगात ही रेल्वे नाशिककरांच्या सेवेत रुजू केली आहे.
5/6
ही पंचवटी एक्स्प्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.
6/6
नाशिक- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आजपासून नव्या रंगात, नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. आरामदायी बैठक व्यवस्था, आसनालगत मोबाईल चार्जिंगची सुविधा, बोग्यांना नवा रंग, बोगीच्या दोन्ही बाजूला कचरा पेटीची व्यवस्था, अशा एक ना अनेक सोयी-सुविधा पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आहेत.