एक्स्प्लोर
जाहिरात जगतात धोनीच्या कमाईत 47%नी घट, तरीही अव्वल!

1/5

नवी दिल्ली: टीम इंडियाचा एकदिवसीय आणि 20-20 सामन्यांचा कर्णधार एम.एस. धोनीच्या जीवनावर अधारित बायोपिकने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेत, 132 कोटींचा आकडा सहज पार केला.
2/5

पण दुसरीकडे जाहिरात जगतात धोनीच्या कमाईवर परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या फॅब-40 जणांच्या यादीत गेल्या वर्षभरात धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये कमालीची घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत 47% घट झाली असून, त्याच्या जाहिरातीद्वारे होणाऱ्या कमाईत 140 कोटीवरुन थेट 73 कोटी रुपयांवर घसरण झाली आहे.
3/5

विशेष म्हणजे, ही घसरण होऊनही इतर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत त्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, जगातील टॉप-10 खेळाडूंच्या यादीत धोनी दहाव्या स्थानी असून, भारतीय क्रीडा क्षेत्रातील टॉप-10च्या यादीत तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.
4/5

यापूर्वी फोर्ब्सच्या या यादीत धोनी पाचव्या स्थानी होता. गेल्या वर्षी त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू 140 कोटी रुपये होती. मात्र, यावर्षी त्यात घसरण झाल्याने त्याला दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.
5/5

या यादीत खेळाडूंच्या कमाईचे मुल्यमापन करताना, त्याच्या एकूण उत्पन्नातून जाहिरातीद्वारे कमावलेले उत्पन्न वेगळे कढून ही यादी दिली जाते. या आधारावरच त्या खेळाडूंची ब्रॅण्ड व्हॅल्यू निश्चित होते.
Published at : 02 Nov 2016 04:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
