याआधी केएल राहुलने पहिल्या वन डेमध्ये शतक ठोकलं होतं. पदार्पणातच शतक ठोकणारा राहुल भारताचा पहिला फलंदाज ठरला.
2/6
पहिल्या 3 वन डे सामन्यात राहुलच्या 196 धावा आहेत. आता नवजोत सिंह सिद्धू यांच्यापेक्षा तो केवळ 3 धावांनी मागे आहे. त्याने मनिष पांडे (181 धावा) आणि युवराज सिंहला (143 धावा) मागे टाकलं आहे.
3/6
63 धावांच्या खेळीत लोकशने युवराज सिंह आणि मनिष पांडे यांना धोबीपछाड दिली. पहिल्या 3 वन डे सामन्यात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल 196 धावांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे.
4/6
या वन डे सीरिजमध्ये पदार्पण करणाऱ्यांमध्ये लोकश राहुलचाही समावेश आहे. राहुलने पहिल्या 3 वन डे सामन्यातच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
5/6
या मालिकेतील तीन सामन्यात मिळून लोकेश राहुलने 196 धावा ठोकल्या. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 100 धावा, दुसऱ्या सामन्यात 33 धावा आणि अखेरच्या सामन्यात 63 धावा कुटल्या होत्या.
6/6
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भारताने 3-0 असा विजय मिळवला. दमदार कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलची 'मॅन ऑफ द सीरिज' म्हणून निवड करण्यात आली. या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याने नाबाद 63 धावांनी खेळी रचली.