दीर्घ सुट्यांच्या आनंदानंतर आज राज्यातील शाळा सुरू होत आहेत. हा दिवस विद्यार्थ्यांचा ‘गोड’ जावा, यासाठी राज्यभरातील विविध शाळा विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये मिकी माऊसने विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. मिकी माऊससोबत विद्यार्थ्यांनी धमाल मस्ती केली.