शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. 16 धावा करणाऱ्या अंबाती रायडूने विजयी चौकार ठोकला.
2/9
चेन्नईने यंदा तिसरं विजेतेपद पटकावून आयपीएलमधलं पुनरागमन मोठ्या रुबाबात साजरं केलं. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईवर गेली दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्याच नेतृत्त्वात मैदानात उतरत आपणच चॅम्पियन असल्याचं सिद्ध करुन दिलं.
3/9
धोनीच्या अगोदर हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा विकेटकीपर रॉबिन उथप्पाच्या (32) नावावर होता.
4/9
यासोबतच चेन्नईने तीन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाचीही बरोबरी केली.
5/9
उथप्पानंतर दिनेश कार्तिकचा (30) नंबर लागतो.
6/9
धोनीने विकेटच्या मागे आतापर्यंत 33 स्टम्पिंग केल्या आहेत.
7/9
धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेटकीपर ठरला आहे.
8/9
आयपीएल टायटल जिंकण्यासोबतच धोनीने आणखी एक विक्रम नावावर केला.
9/9
चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं.