सलमान खान आणि सोनम कपूर यांचा 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा देखील 180 कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. या सिनेमानंही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
2/6
महागड्या सिनेमांमध्ये शाहिद कपूर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा 'पद्मावती' या सिनेमाचं देखील नाव पुढं येत आहे. हा सिनेमा तयार करण्यासाठी तब्बल 200 कोटी खर्च झाल्याचं वृत्त समजतं आहे.
3/6
आपल्या प्रत्येक सिनेमानंतर नवनवे विक्रम करणारा आमिर खानच्या धूम-3 या सिनेमासाठी तब्बल 175 कोटीं खर्च आला होता.
4/6
बाहुबली-2 या सिनेमासाठी 250 कोटी खर्च आला होता. या सिनेमात प्रभास हा प्रमुख भूमिकेत होता. या सिनेमानं फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही चांगली कमाई केली होती. एवढंच नव्हे तर कमाईच्या बाबतीत या सिनेमानं देश आणि जगभरात अनेक रेकॉर्ड केले आहेत.
5/6
बाहुबली - 1 हा सिनेमा तयार करण्यासाठी तब्बल 180 कोटी खर्च आला होता. मात्र, या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
6/6
जर तुम्ही विचार करत असाल की, बाहुबली-2 हा भारतातील सर्वात महागडा सिनेमा आहे. तर तसं अजिबात नाही. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमार यांचा आगामी सिनेमा '2.0' हा तब्बल 400 कोटींचा असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक एस. शंकर हे आहेत. हा सिनेमा रजनीकांतच्या 'रोबोट' सिनेमाचा सिक्वेल आहे.