एक्स्प्लोर
India Lockdown | पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
1/11

गुजरातमध्ये 151 लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
2/11

हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमलामध्ये 118 लोकांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले.
3/11

जम्मू काश्मीर पोलिसांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांच्या विरोधात 218 प्राथमिक गुन्ह्यांची नोंद केली आहे.
4/11

लॉकडाऊनदरम्यान सरकारी आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर 5,103 लोकांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. तर 180 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5/11

उत्तर प्रदेशमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांच्या 1,788 लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एकूण 5,599 लोकांचं चलानही कापण्यात आलं आहे.
6/11

बिहारमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या 9 लोकांना अटक करण्यात आली आणि 531 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
7/11

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये जवळपास 9 हजार गाड्या जप्त करण्यात आल्या.
8/11

उत्तर प्रदेशमध्ये काल पोलिसांनी जवळपास साडेपाच हजार वाहन चालकांकडून दंड वसुल केला.
9/11

लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला, गाड्या जप्त करण्यात आल्या. तर अनेकांवर एफआयआरही दाखल करण्यात आला.
10/11

देशात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली.
11/11

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हतबल झालं आहे. अनेक देशांत लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारत सरकारनेही देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. मंगळवारी (24 मार्च) नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. अशातच बुधवारी (25 मार्च) रोजी संपूर्ण देशात या लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. देशात लॉकडाऊन असूनही लोकं बिनदिक्कतपणे रस्त्यांवर फिरताना दिसून आले. जगभरात शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या कोरोनाबाबत लोकांमध्ये अजुनही गांभीर्य दिसत नाही. लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना काठीचा मारही दिला. तर अनेकांना उठाबशा काढायला लावले. पाहूयात फोटो...
Published at : 26 Mar 2020 09:21 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















