नागपुरातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी गणरायाचं उत्साहात आगमन झालं आहे. विधीवत पूजा करुन बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली...सर्वांच्या जीवनात आनंद यावा अशी मागणी यावेळी गडकरींनी बाप्पाकडे केली आहे.
2/6
मुंबईत शिवसेना नेते मनोहर जोशींच्या घरीही बाप्पांचं उत्साहात आगमन झालं. शिवसेना स्वबळावर सत्तेत यावी असं मागणं यावेळी मनोहर जोशींनी बाप्पाला घातलं आहे.
3/6
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या मुंबईतल्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी सुशील कुमार शिंदेसह प्रणीती शिंदे यांनीही गणरायाची मनोभावे आरती केली.
4/6
कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूरमधील घरी बाप्पा दाखल झाले. सकाळीच इथे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या परिवारानं गणरायाची आरती केली.
5/6
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. यावेळी संपूर्ण कुटुंबाने बाप्पाची आरती एकत्र केली आणि भक्तीच्या रंगात दंग झालेले दिसले.
6/6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.