एक्स्प्लोर
दिग्गज पाच खेळाडू, ज्यांना कसोटीचं शतक पूर्ण करता आलं नाही!

1/6

मोहम्मद युसूफ : पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद युसूफने 2006 च्या मोसमात कसोटीमध्ये 100 च्या सरासरीने 1788 धावा ठोकल्या. त्याच्या खात्यात एकूण 7530 धावांचा समावेश आहे, ज्यामध्ये 24 शतकं आणि 33 अर्धशतकं आहेत. मात्र 2010 सालचा ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी काळ बनून आला. पाकिस्तानचा पराभव झाला आणि बोर्डाने त्याच्यावर एका प्रकरणात कारवाई करत खेळण्यासाठी बंद घातली. या कारवाईनंतर युसूफने निवृत्तीची घोषणा केली. कारकीर्दीत मोहम्मद युसूफला केवळ 90 कसोटी सामने खेळता आले. त्याच्यावर बंदी घालण्यात आली नसती, तर तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आला असता.
2/6

मोहम्मद अझरुद्दीन : टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या कसोटी कारकीर्दीची सुरुवातच मोठ्या विक्रमाने झाली. त्याने सुरुवातीच्या सलग तीन सामन्यांमध्ये शतक ठोकलं, जो विक्रम अजूनही कुणी मोडू शकलेलं नाही. मात्र अझरुद्दीनला शंभरावी कसोटी खेळता आली नाही. त्याच्या कारकीर्दीचा अंत मॅच फिक्सिंगने झाला. कोर्टाने जरी त्याला दिलासा दिला असला, तरी बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली. 99 कसोटी सामन्यांच्या 147 डावांमध्ये त्याने 6215 धावा केल्या, ज्यामध्ये 22 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.
3/6

महेंद्रसिंह धोनी : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2014 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानकच निवृत्तीची घोषणा केली. फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला आणि सततच्या पराभवामुळे त्याच्यावर दबाव वाढला, ज्यामुळे त्याने परदेशातच कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने आपल्या कसोटी कारकीर्दीत 90 सामने खेळले, ज्यामध्ये 38 च्या सरासरीने त्याने 4876 धावा केल्या. यामध्ये सहा शतकं आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. 224 ही त्याची कसोटीतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.
4/6

कर्टली अॅम्ब्रोस : वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस जगभरातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. 6 फूट 7 इंच एवढी उंची असलेल्या या खेळाडूने जगभरातील फलंदाजांना जेरीस आणून सोडलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक धाव देऊन सात विकेट घेण्याचा त्याचा विक्रम कुणीही विसरु शकत नाही. त्याच्या 12 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये तो क्वचितच आऊट ऑफ फॉर्म असायचा. मात्र शेवटी शेवटी पाठीच्या त्रासाने आणि संघाच्या पराभवाने तो खचला आणि त्याने 98 कसोटी सामने खेळल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. 21 च्या सरासरीने त्याने कसोटीमध्ये 405 विकेट घेतल्या.
5/6

कसोटी क्रिकेटमध्ये एकीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने कारकीर्दीत 200 कसोटी सामने खेळले, तर दुसरीकडे इंग्लंडचा खेळाडू अॅलिस्टर कूक, ज्याने सलग 154 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला. मात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे काही दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना 100 कसोटी सामने खेळता आले नाहीत.
6/6

अॅडम गिलख्रिस्ट : आपल्या दमदार फलंदाजीने कसोटी क्रिकेटचा इतिहास आणि भूगोल बदलणाऱ्या अॅडम गिलख्रिस्ट त्या खेळाडूंमध्ये सहभागी आहे, ज्यांना 100 कसोटी सामने पूर्ण करता आले नाही. 1999 साली कसोटी पदार्पण करणाऱ्या गिलख्रिस्टने 2008 साली निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या कारकीर्दीमुळे तो अनेकांचा आदर्श बनला. गिलख्रिस्टने एकूण 96 कसोटी सामने खेळले आणि यामध्ये 47.60 च्या सरासरीने 5570 धावा केल्या. या धावांमध्ये 17 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. गिलख्रिस्टच्या खेळीमध्ये सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम आहे.
Published at : 02 Jun 2018 08:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
