एक्स्प्लोर
सायबर अटॅकचा पाच कोटी फेसबुक युझर्सना फटका, आपोआप अकाऊंट लॉग आऊट
1/5

फेसबुकने गुरुवारी रात्री या अटॅकवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, फेसबुक युझर्सचा डेटा हॅकर्सने मिळवला आहे, की नाही याबाबतची माहिती अजून कंपनीकडे नाही. हॅक केलेल्या अकाऊंटचा गैरवापर झालाय की नाही याची अद्याप माहिती नसल्याचं फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं.
2/5

फेसबुककडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पाच कोटी युझर्सच्या सिक्युरिटीवर हा हल्ला झाला. सुरक्षात्मक उपाय म्हणून आणखी चार कोटी युझर्सचे अकाऊंट लॉग आऊट केले आहेत. युझर्सना पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
3/5

फेसबुककडून या प्रकाराची सध्या चौकशी सुरु असून हॅकर्स कोण होते, याची माहिती मिळू शकलेली नाही, असं कंपनीने म्हटलं आहे. हॅकर्सने फेसबुकच्या View As फीचरच्या कोडवर अटॅक केला आणि प्रोफाईलला टेकओव्हर केलं. या कोडमुळे हॅकर्सना युझर्सच्या अकाऊटंमध्ये लॉग ईन करण्यासाठी पासवर्डची गरज पडली नाही.
4/5

शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास 90 लाखांपेक्षा जास्त अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाले. युझर्सचे अकाऊंट का लॉग आऊट झाले, याची माहिती युझर्सना दिली जाईल, असं कंपनीने म्हटलं आहे.
5/5

फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंटला डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका बसला आहे. फेसबुकवर अटॅक करणाऱ्या हॅकरने एक कोड टेकओव्हर करत युझर्सचे अकाऊंट आपल्या ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.
Published at : 29 Sep 2018 08:58 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















