डॉक्टरांनी दोघांनाही विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ‘द मिनिस्ट्री’ सिनेमात दोघांचीही भूमिका शारीरिक डिमांडिंग आहे. त्यामुळे प्रकृती पूर्णपणे ठिक झाल्यानंतरच शुटिंग सुरु केलं जाईल, असं विशाल भारद्वाज यांनी म्हटलं आहे. (फोटो : मानव मंगलानी)
2/8
सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता इरफान खानही सध्या आजारी आहे, तर दीपिकाच्या बॅक पेनने उचल खाल्ली आहे, ज्याचा त्रास तिला ‘पद्मावत’मधील 'घूमर' गाण्याच्या शुटिंगवेळी जाणवला होता, अशी माहिती विशाल भारद्वाज यांनी एका पोस्टद्वारे दिली.
3/8
सिनेमातील दोन्हीही मुख्य भूमिकेतील कलाकारांची प्रकृती सध्या ठिक नसल्याने शेड्यूल पुढे ढकलत असल्याचं दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी म्हटलं आहे. ‘द मिनिस्ट्री’ या सिनेमाची शुटिंग पुढे ढकलण्यात आली आहे.
4/8
यावर दीपिका सध्या उपचार घेत असून डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
5/8
संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ सिनेमातील ‘नगाडा’ या गाण्याच्या वेळी दीपिकाला हा त्रास सुरु झाला होता. मात्र या त्रासाने ‘पद्मावत’ सिनेमातील ‘घूमर’ गाणं शुट करताना पुन्हा उचल खाल्ली आहे.
6/8
विविध अंदाजांनंतर दीपिकाच्या मानेवर असलेल्या बँडेजचं कारण समोर आलं आहे. ती सध्या बॅक पेनचा सामना करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
7/8
दीपिकाच्या मानेवर लावलेलं बँडेज पाहून वेगवेगळे अंदाज लावले जात होते. तिच्या मानेवर असलेल्या टॅट्टूचीही चर्चा झाली.
8/8
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण बुधवारी मुंबई विमानतळावर दिसून आली. यानंतर तिच्या हटके लूकची चर्चा तर झालीच, मात्र एका गोष्टीने सर्वांनाच विचारात टाकलं, ते म्हणजे तिच्या मानेवर लावण्यात आलेलं बँडेज..